इस्रोचा ४.७ टन वजनाचा उपग्रह GSAT-२० अमेरिकन कंपनी SpaceX च्या Falcon ९ रॉकेटद्वारे अंतराळात नेण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संस्थेची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने बुधवारी प्रथमच SpaceX ची सेवा घेण्याची घोषणा केली. हे प्रक्षेपण वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रोकडे सध्या सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV-MK3 आहे. तो चार हजार किलो वजनाचा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (जीटीओ) नेऊ शकतो. या क्षमतेपेक्षा GSAT-२० चे वजन ७०० किलो जास्त आहे. या कारणास्तव एलॉन मस्कच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सच्या सेवा प्रथमच वापरल्या जात आहेत. फाल्कन-९ रॉकेट ८३०० किलो वजनाचा उपग्रह जीटीओला पाठवू शकतो.

हेही वाचाः निर्मला सीतारामण यांच्या नव्या अर्थसंकल्पात चीनला मिळणार आव्हान; ‘या’ मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

इस्रो १० टन क्षमतेचे रॉकेट बनवत आहे

या वेळेप्रमाणे भारताला फार काळ परदेशी रॉकेटवर अवलंबून राहावे लागणार नाही. विद्यमान रॉकेटच्या मर्यादित क्षमतेच्या पलीकडे जाऊन भारतीय अंतराळ संस्था नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) विकसित करण्याच्या तयारीत आहे. NGLV कडे १० हजार किलो वजनाचे उपग्रह किंवा उपकरणे GTO पर्यंत नेण्याची क्षमता असेल.

हेही वाचाः पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी केलं स्पष्ट

अंदमान आणि लक्षद्वीपपर्यंत उपग्रह सेवा उपलब्ध असणार

GSAT-२० हा एक संचार उपग्रह आहे. लवकरच त्याचे GSAT-N2 असे नामकरण केले जाणार आहे. याद्वारे ब्रॉडबँड, इन-फ्लाइट आणि मेरिटाइम कम्युनिकेशन्स (IFMC) आणि सेल्युलर बॅकहॉल सेवांशी संबंधित गरजा पूर्ण केल्या जातील. यात केए-केए बँड हाय थ्रूपुट सॅटेलाइट (एचटीएस) क्षमता असेल, जी ४८ जीबीपीएस असल्याचे मानले जाते. हे एकाच वेळी ३२ बीम प्रसारित करण्याची क्षमता प्रदान करणार आहे. GSAT-२० देशातील दुर्गम भाग कव्हर करण्यास सक्षम राहणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro signs deal with elon musk company spacex to launch gsat 20 satellite on falcon 9 rocket vrd