प्राप्तिकर विभागाच्या धाडीत कोट्यवधी रुपये जप्त केले जातात. करचुकवेगिरी केलेल्यांकडे अनेकदा पैशांचं मोठं घबाड सापडतं. तर काहींकडे कोट्यवधींचे दागिने बेहिशेबी सापडतात. ही बेहिशेबी मालमत्ता मोजताना अनेक अधिकाऱ्यांची दमछाक होते. अशावेळी पैसे मोजायची मशिनही कमी पडतात. आता चक्क शूट ट्रेडर्स म्हणजे चप्पल व्यापारांच्या दुकानांवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे.

दिल्लीत प्राप्तिकर विभागाने शनिवारी (१८ मे) मोठी धाड टाकली. १४ ठिकाणी झालेल्या छापेमारीत जवळपास १०० कोटींची रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये ही रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने सापडले.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा
pune burglaries marathi news
पुणे : तीन घरफोड्यांत साडेसहा लाखाचा ऐवज चोरीला
Absconding young woman arrested , woman arrested fraud case, woman fraud with builder,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड
pune crime news
पुणे : प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह साथीदार गजाआड
Mahavitaran Company registered cases against electricity thieves in Khandeshwar and Kalamboli police station
कळंबोली आणि खांदेश्वरमध्ये १७ लाख रुपयांची विजचोरी

हेही वाचा >> Maharashtra Board 12th Results 2024: ठरलं! १२ वीचा निकाल उद्या! मूळ गुणपत्रिका कधी मिळणार?

आग्रा, लखनौ, कानपूर आणि नोएडा येथील अधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी आणि पोलिसांसह प्राप्तिकर पथकाने शनिवारी सकाळी ११ वाजता एमजी रोडचे बीके शूज, धाकरनचे मनशु ​​फूटवेअर आणि हिंग मंडीच्या हरमिलाप ट्रेडर्सच्या ठिकाणी छापे मारले. प्राप्तिकर विभागाने सोन्या-चांदीचे दागिने आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या गुंतवणुकीची कागदपत्रेही जप्त केली आहेत. तसंच, फक्त दुकानातच नव्हेतर मालकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. जवळपास ४२ तासांहून अधिक काळ ही छापेमारी सुरू होती.

सोन्या-दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक गॅझेटही जप्त

प्राप्तिकर विभागाने कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, लॅपटॉप आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. हरमिलाप ट्रेडर्सचे मालक रामनाथ डुंग यांच्या जयपूर निवासस्थानातून या टीमला बेड, गाद्या, कपाट, शू बॉक्स, पिशव्या आणि भिंतींमध्ये भरलेले ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले होते. गोविंद नगर येथील रामनाथ डांग यांच्या घरीही ४० कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. ही रोकड मोजण्याचं काम रात्रभर सुरू होतं.

करचुकवेगिरी केल्याचा आरोप

बीके शूज आणि मनशु फूटवेअरने करचुकवेगिरी केल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader