FSSAI Directs Airlines for Food Safety: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने विमानामधील प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न देण्यासाठी एअरलाइन कंपन्या आणि केटरर्सबरोबर एक बैठक घेतली आहे. या बैठकीत FSSAI ने विद्यमान नियम आणि प्रोटोकॉलमधील त्रुटी दूर करण्यासाठी चर्चा केली. एअरलाइन्समध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणताही निष्काळजीपणा मान्य नाही. अन्नाच्या दर्जाची पूर्ण काळजी घेणे ही एअरलाइन्स आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असंही बैठकीत FSSAI ने सांगितले.

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची संपूर्ण माहिती असावी

बैठकीत FSSAI ने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या मेनू लेबलिंगचा मुद्दाही उपस्थित केला. पौष्टिक मूल्य आणि इतर सर्व माहिती प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या पॅकेजवर नमूद करणे आवश्यक असल्याचे FSSAI ने एअरलाइन्स आणि केटरर्सना सांगितले आहे. अन्न तयार करण्याच्या उत्पादनाच्या तपशीलाविषयी माहिती देणेदेखील महत्त्वाचे आहे. या सर्व टप्प्यांमुळे पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे आणि उड्डाणांमध्ये प्रवाशांना उत्तम दर्जाचे जेवण देता येणे शक्य होणार आहे.

meta 213 crores fine
‘मेटा’ला २१३ कोटी रुपयांचा दंड, भारतीय स्पर्धा आयोगाकडून कठोर शेऱ्यांसह आदेश
finance minister Nirmala Sitharaman
बँकांची कर्ज परवडणारी हवीत – सीतारामन
urban unemployment percentage marathi news
शहरी बेरोजगारीचा टक्का सप्टेंबर तिमाहीअखेर ६.४ टक्क्यांवर, तिमाहीगणिक ०.२ टक्क्यांनी घसरण
sbi marathi news
स्टेट बँक वर्षभरात आणखी ५०० शाखा सुरू करणार! सर्वात मोठ्या बँकेचे शाखाविस्तारात २३ हजारांचे लक्ष्य
banks administrative work
बँकांनी प्रशासकीय चौकट भक्कम करावी – दास; अनिष्ट पद्धतींना आळा घालण्याचे गव्हर्नरांचे आवाहन
bank of baroda stock market latest marathi news
धास्तावलेल्या शेअर गुंतवणूकदारांना दिलासा; वर्षभरात २०-२५ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक बाजारात परतेल
Direct tax collection marathi news
प्रत्यक्ष कर संकलन उद्दिष्टापेक्षा अधिक होईल, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांचा आशावाद
Today’s Gold Silver Price 18 November 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण! खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील आजचा दर
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास

हेही वाचाः Money Mantra : NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

FSSAI ने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. प्राधिकरणाने विमान कंपन्यांना वेळोवेळी अशा कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून केबिन क्रू मेंबर्स आणि एअरलाइन कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षेबाबत माहिती मिळू शकेल.

सँडविचमध्ये किडे सापडले

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात सर्व्ह केलेल्या सँडविचमध्ये किडे सापडल्याची घटना अलीकडेच समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ महिला प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर इंडिगोला याप्रकरणी माफी मागावी लागली होती. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना इंडिगोने सांगितले होते की, दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानातील एका प्रवाशाच्या सँडविचमध्ये किडे सापडल्याची घटना समोर आली आहे.