FSSAI Directs Airlines for Food Safety: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने विमानामधील प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न देण्यासाठी एअरलाइन कंपन्या आणि केटरर्सबरोबर एक बैठक घेतली आहे. या बैठकीत FSSAI ने विद्यमान नियम आणि प्रोटोकॉलमधील त्रुटी दूर करण्यासाठी चर्चा केली. एअरलाइन्समध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणताही निष्काळजीपणा मान्य नाही. अन्नाच्या दर्जाची पूर्ण काळजी घेणे ही एअरलाइन्स आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असंही बैठकीत FSSAI ने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची संपूर्ण माहिती असावी

बैठकीत FSSAI ने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या मेनू लेबलिंगचा मुद्दाही उपस्थित केला. पौष्टिक मूल्य आणि इतर सर्व माहिती प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या पॅकेजवर नमूद करणे आवश्यक असल्याचे FSSAI ने एअरलाइन्स आणि केटरर्सना सांगितले आहे. अन्न तयार करण्याच्या उत्पादनाच्या तपशीलाविषयी माहिती देणेदेखील महत्त्वाचे आहे. या सर्व टप्प्यांमुळे पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे आणि उड्डाणांमध्ये प्रवाशांना उत्तम दर्जाचे जेवण देता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचाः Money Mantra : NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

FSSAI ने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. प्राधिकरणाने विमान कंपन्यांना वेळोवेळी अशा कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून केबिन क्रू मेंबर्स आणि एअरलाइन कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षेबाबत माहिती मिळू शकेल.

सँडविचमध्ये किडे सापडले

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात सर्व्ह केलेल्या सँडविचमध्ये किडे सापडल्याची घटना अलीकडेच समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ महिला प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर इंडिगोला याप्रकरणी माफी मागावी लागली होती. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना इंडिगोने सांगितले होते की, दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानातील एका प्रवाशाच्या सँडविचमध्ये किडे सापडल्याची घटना समोर आली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It will be expensive if you ignore the food and drink of the passengers these important instructions have been received by the airlines from the government vrd
Show comments