ITR Return 2023 : आयटीआर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख संपुष्टात आली आहे. ३१ जुलै २०२३ पर्यंत ६ कोटींहून अधिक जणांनी रिटर्न भरले आहेत. विशेष म्हणजे प्राप्तिकर विभाग आता करदात्यांना कर परतावाही देत ​​आहे. यंदा एप्रिल-जून २०२३ दरम्यान भरलेल्या प्राप्तिकर रिटर्नची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. आता त्याची संख्या १.३६ कोटींच्या पुढे गेली आहे. वेबसाइटवर शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी लवकर रिटर्न भरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा जुलैमध्ये ५.४१ कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरले आहेत. जुलैअखेर हा आकडा ६.७७ कोटींहून अधिक झाला. दुसरीकडे ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या आयटीआर फायलिंगच्या तुलनात्मक डेटानुसार, गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल-जून २०२२-२३ मध्ये ७०.३४ लाखांहून अधिक कर रिटर्न भरले गेलेत.

हेही वाचाः Money Mantra : वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे मिड कॅप फंड; ‘या’ ७ फंडांमध्ये मोठा लाभ

तसेच एप्रिल-जून २०२३-२४ या आर्थिक वर्षात ही संख्या ९३.७६ टक्क्यांनी वाढून १.३६ कोटींहून अधिक झाली आहे. यंदा २६ जूनपर्यंत १ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात ८ जुलै रोजी १ कोटी ITR दाखल करण्यात आले. प्राप्तिकर विभागाने लवकर आयटीआर दाखल करण्याचे श्रेय करदात्यांना तसेच ई-मेल, एसएमएस मोहीम आणि सोशल मीडिया मोहिमांना दिले आहे.

हेही वाचाः पत्नीच्या वाढदिवशी नारायण मूर्तींनी सोडली नोकरी अन् सुधा मूर्तींनी दिले १० हजारांचं कर्ज…, वाचा पुढे काय झालं?

आयटीआर केव्हा भरता येणार?

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ होती. या तारखेपर्यंत रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागला नाही. त्याचबरोबर अनेक करदात्यांनी अद्याप विवरणपत्र भरलेले नाही. त्यांना अजूनही संधी आहे. ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत रिटर्न भरू शकतात. याबरोबरच त्यांना दंडही भरावा लागणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itr filing twice as many itrs filed between april june compared to last year the number of returns exceeded 1 36 crore vrd
Show comments