ॲमेझॉनचे संस्थापक सीईओ जेफ बेझोस यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनी कंपनीचे ६.५३ कोटी शेअर्स विकले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शेअर्सची ही विक्री गेल्या वर्षी झाली होती, ज्याची माहिती नुकतीच नियामक फायलिंगमध्ये देण्यात आली आहे. मात्र, मॅकेन्झी स्कॉटकडून याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. जेफपासून घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेन्झीला सेटलमेंटमध्ये ४ टक्के शेअर्स मिळाले. त्यांची किंमत तेव्हा सुमारे ३६ अब्ज डॉलर्स होती. यासह मॅकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सामील झाली होती. तिने २०१९ मध्येच तिची अर्धी संपत्ती दान करण्याची घोषणा केली होती आणि ती सतत करत आहे. आतापर्यंत त्यांनी विविध धर्मादाय कार्यांसाठी १६.५ अब्ज डॉलर्स दान केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः सर्वोच्च मूल्यांकन असलेल्या महत्त्वाच्या ७ भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य आता ‘इतके’ कोटी

२५ टक्के हिस्सा विकला गेला

मिळालेल्या माहितीनुसार, मॅकेन्झीने विकलेल्या समभागांची संख्या कंपनीमध्ये त्याच्या २५ टक्के हिश्श्याची आहे. या विक्रीचे मूल्य १०.४ अब्ज डॉलर आहे. भारतीय चलनात बघितले तर ते ८६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. ही विक्री असूनही मॅकेन्झीची एकूण संपत्ती अजूनही ४२.६ अब्ज डॉलर आहे. मॅकेन्झी या आजच्या काळातील महान दानधर्म करणारी व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. तिने १९९३ मध्ये जेफ बेझोसबरोबर लग्न केले होते. त्यानंतर ती ॲमेझॉनच्या पहिल्या कर्मचाऱ्यांपैकी एक होती. २५ वर्षांनंतर २०१९ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचाः ”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”

मॅकेन्झी ही एक लेखिकाही आहे

मॅकेन्झी ही एक लेखिकाही आहे. २००५ मध्ये तिने पहिली कादंबरी लिहिली. तिचे नाव होते द टेस्टिंग ऑफ ल्यूथर अल्ब्राइट. यासाठी तिने २००६ मध्ये अमेरिकन बुक अवॉर्ड मिळाला. २०२१ मध्ये फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत मॅकेन्झीचा समावेश होता. इतकेच नाही तर २०२० च्या आधी टाइम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी ती एक होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeff bezos ex wife sells 10 billion in shares gets 4 percent of company in divorce settlement vrd
Show comments