भारतातील दर्जेदार हवाई सेवा उद्योगाची प्रणेती म्हणून जेट एअरवेजला इतिहासात नेहमीच एक विशेष स्थान असेल. देशातील पहिली खासगी परिपूर्ण हवाईसेवेने, काही काळ क्रमांक देशातील क्रमांक एकची कंपनी म्हणून वैभव अनुभवले. परंतु पुढे संस्थापकांचा आर्थिक गैरव्यवहार आणि नरेश गोयल यांना तुरुंगवारी, कायम सुरू राहिलेली न्यायालयीन कज्जांची मालिका ते दिवाळखोरीपर्यंतचा खडतर प्रवासही तिच्या वाट्याला आला. ३२ वर्षाच्या तिच्या या सफरीचा करुण शेवट हा कंपनीच इतिहासजमा होऊन होत आहे. तब्बल २०,००० कर्मचाऱ्यांचा रोजगार आणि बँका व वित्तसंस्थांचे हजारो कोटींचा कर्ज निधीही यातून लयाला गेला.

कालानुरूप घटनाक्रम – 

Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Mig 29 crashes
Mig 29 Crasesh : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले; जमिनीवर कोसळताच आगीत भस्मसात!
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Analog Space Mission :
Analog Space Mission : भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन लडाखमध्ये सुरू; इस्रोची ही अंतराळ मोहीम काय आहे?
Two terrorist organizations Jaish e Mohammed and SJF plan to bomb airports railway stations and temples
विमानात बॉम्बची धमकी देणारा …, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल काय म्हणाले जाणून घ्या
Sai Sudarshan century against Australia A
Sai Sudarshan : आयपीएलमध्ये रिटेन करताच साई सुदर्शनचा शतकी नजराणा, ऑस्ट्रेलियात साकारली दमदार खेळी
modi with army
इंचभर भूमीचीही तडजोड नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले; कच्छमध्ये जवानांबरोबर दिवाळी

१ एप्रिल १९९२ – जेट एअरवेजची हवाई सेवा म्हणून स्थापना
१९९३ – भारतीय आकाशात जेट एअरवेजची विमाने झेपावली
२००३ – ४१ विमानांच्या ताफ्यासह, दररोज २५० उड्डाणे
२००४ – आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी परवानगी
२००४ – समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध
२००७ – एअर सहाराचे संपादन
२०१३ – एतिहाद एअरवेजच्या माध्यमातून परकीय गुंतवणूक, २४ टक्के भागभांडवलाची विक्री
२०१६ – जगभरात ७४ ठिकाणांवर दररोज ३०० उड्डाणांसह देशातील क्रमांक एकची हवाई सेवा म्हणून स्थान
मार्च २०१८ – १,०३६ कोटी रुपयांच्या तोट्याची पहिल्यांदाच नोंद
जून २०१८ – तोटा वाढून १,३२३ कोटींवर
ऑक्टो. २०१८ – वैमानिकांचा असहकार, कंपनीकडून वेतन लांबणीवर
डिसें. २०१८ – बँकांचा कर्ज हप्ता भरण्यात कंपनीकडून पहिल्यांदा कसूर
जानेवारी २०१९ – कर्मचाऱ्यांचे कैक महिन्यांचे वेतन थकीत
एप्रिल २०१९ – विमानांचे भाडे न भरल्याने उड्डाणे ठप्प आणि पुढे कंपनीकडूनच सर्व उड्डाणे स्थगित
जून २०१९ – स्टेट बँकेकडून कंपनीच्या दिवाळखोरीचा अर्ज
ऑक्टो. २०२० – जालान-कालरॉक संघाच्या बोलीला कर्जदात्यांची मंजुरी
जून २०२१ – कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडून जालान-कालरॉक संघाच्या योजनेला मान्यता
२०२२ – मुदतवाढ मिळूनही जालान-कालरॉक संघाकडून रक्कम जमा करण्यासाठी चालढकल
जुलै २०२३ – विमानोड्डाण परवान्याचे नूतनीकरण
मार्च २०२४ – जालान-कालरॉक संघाकडे मालकी हस्तांतरणाला ‘एनसीएलएटी’ची मान्यता आणि कर्जदात्यांकडून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान.