खरं तर ३१ जुलै हा जेट एअरवेजसाठी खूप महत्त्वाचा दिवस ठरला आहे. आता लवकरच जेट एअरवेजची विमाने पुन्हा हवेत उडू शकणार आहेत. कारण DGCA ने जेट एअरवेज या विमान कंपनीचे विमानतळ ऑपरेटर प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे आता या कंपनीची विमानं पुन्हा हवेत उड्डाण करणार आहेत. जेट एअरवेजची बोली जिंकणाऱ्या जालान कॅलरॉक कंसोर्टियम (JKC) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जेट एअरवेजला भारतीय हवाई ऑपरेटर म्हणजेच DGCA कडून उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे. बराच वेळ जमिनीवर राहिल्यानंतर आता विमान कंपनी विमान उडवू शकते, असंही JKC ने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः राज्यात आतापर्यंत १ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

४ वर्षांपासून उड्डाणे बंद होती

२५ वर्षे आकाशात उड्डाण केल्यानंतर जेट एअरवेज एप्रिल २०१९ मध्ये जमिनीवर आली. तोटा, कर्ज आणि थकबाकीच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजला तेव्हा आपली उड्डाणे थांबवावी लागली. जून २०१९ मध्ये NCLT ने एअरलाइन्सला दिवाळखोर घोषित केले. त्यानंतर आज म्हणजेच ३१ जुलै DGCA ने फ्लाइट कंपनीला उड्डाणाची परवानगी दिली आहे.

हेही वाचाः दिल्ली उच्च न्यायालयाने कलानिधी मारन यांची याचिका फेटाळली, आता १३२३ कोटी मिळणार नाहीत

मंजुरी मिळताच शेअरने घेतली उसळी

जेट एअरवेजच्या विमानतळ ऑपरेटर प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाचाही त्याच्या शेअरवरही परिणाम झाला. जेट एअरवेजचे शेअर्स सोमवारी अपर सर्किटवर उघडले. दुपारपर्यंतही त्यात अप्पर सर्किट होते. यामुळे जेट एअरवेजचा हिस्सा ४.९८ टक्के म्हणजेच २.४१ रुपयांच्या वाढीसह ५०.८० रुपयांवर आला आहे. तसेच कंपनीचे बाजारमूल्य ५७७.०७ कोटी रुपयांवर पोहोचले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jet airways to fly again dgca gives approval to the airline vrd
Show comments