वाहननिर्मितीतील एमजी मोटार इंडियाच्या ४५ ते ४८ टक्के हिस्सा जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या मालकीची कंपनी विकत घेणार आहे. या व्यवहारात जेएसडब्ल्यू स्टील आणि जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपन्यांचा सहभाग नसल्याचे समजते. एमजी मोटार इंडियाची मालकी एसएआयसी मोटार कंपनीकडे आहे.

जिंदाल हे एमजी मोटारचा ४५ ते ४८ टक्के हिस्सा विकत घेतील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या व्यवहाराला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे सांगितले जात आहे. एमजी मोटार इंडियामध्ये वितरक आणि भारतीय कर्मचाऱ्यांकडे ५ ते ८ टक्के भागभांडवली हिस्सा आहे. उरलेला हिस्सा एसएआयसीकडे असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः २१ व्या वर्षी ४५ लाखांच्या पॅकेजची नोकरी, राजस्थानची तान्या सिंह जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीत कशी पोहोचली?

जिंदाल यांच्या ४८ टक्क्यांच्या अधिग्रहणानंतर, याा कंपनीमधील ५१ टक्क्यांहून अधिक हिस्सा भारतीयांकडे येणार आहे. याच वेळी चिनी कंपनीची भागीदारी अल्पसंख्येत जाऊ शकेल. त्यामुळे या अधिग्रहण व्यवहारानंतर एमजी मोटार इंडिया ही कंपनी भारतीय बनेल. पुढील काही वर्षांत कंपनीचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

हेही वाचाः विश्लेषण : अतिश्रीमंत व्यक्ती २०२३ मध्ये भारत सोडून जाण्याचा अंदाज; अब्जाधीश देशातून स्थलांतर का करतात?