पीटीआय, नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या ग्राहकसंख्येत मे महिन्यात एकत्रिपणे ३४.४ लाख नवीन ग्राहकांची भर पडली आहे. तर कर्जजर्जर असलेल्या व्होडाफोन-आयडियाची पीछेहाट कायम असून तिने ग्राहक गमावले आहेत, असे ट्रायने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.  

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओचे २१.९ लाख नवीन वायरलेस वापरकर्ते जोडले आहेत. त्यापाठोपाठ भारती एअरटेलने मे महिन्यात १२.५ लाख मोबाइल ग्राहक जोडले. मात्र व्होडाफोन आयडियाने या महिन्यात ९.२४ लाख  मोबाइल ग्राहक गमावले. रिलायन्स जिओच्या मोबाइल ग्राहकांची संख्या मे महिन्यात ४७.४६ कोटींवर पोहोचली आहे. जी एप्रिलमध्ये ४७.२४ कोटी होती. व्होडाफोन आयडियाने ग्राहकसंख्येत घट नोंदवल्याने त्यांचा ग्राहकांची संख्या ९.२४ लाखांनी घटून २१.८१ कोटीपर्यंत घसरली आहे.मे महिन्यात सुमारे १.२ कोटी ग्राहकांनी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (एमएनपी) अर्ज केला. भारताचे एकूण ब्रॉडबँड ग्राहक मे २०२४ अखेर ९३.५ कोटीपर्यंत वाढले आहेत.

हेही वाचा >>>Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

विद्यमान महिन्यात तीनही आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी २२ टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली. परिणामी ग्राहकांच्या महिन्याकाठी दूरसंचार सेवेवर होणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिमाणसी महसुलात वाढ होणार आहे. 

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
Story img Loader