रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची कंपनी असलेली जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने कंपनीतील विदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी ‘ई-मतदाना’च्या माध्यमातून भागधारकांकडून मंजुरी मागवली आहे. या प्रस्तावावर मत देण्यास पात्र असलेले भागधारक निश्चित करण्यासाठी १७ मे तारीख निश्चित करण्यात आली होती, भागधारकांसाठी २४ मे ते २२ जून या कालावधीत ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध असेल. जिओ फायनान्स ही नोंदणीकृत बॅंकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : रिलायन्स कॅपिटलची दिवाळखोरी प्रक्रियेसाठी मुदतवाढीची ‘एनसीएलटी’कडे मागणी

ऑक्टोबर २०२० च्या एफडीआय धोरणानुसार, रिझर्व्ह बँकेद्वारे नियमित असलेल्या आणि वित्तीय सेवा क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या कंपनीमध्ये स्वयंचलित मार्गाने १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी आहे. २७ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने ४९ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला (विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीसह) मंजुरी दिली आहे. याशिवाय, कंपनीने रमा वेदश्री यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यासही मंजुरी मागितली आहे.