लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजमधून गेल्या महिन्यात तिचा वित्तीय सेवा क्षेत्रातील उपक्रम ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ वेगळा करण्यात आला होता. विलग झालेल्या ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’चे समभाग येत्या सोमवारी, २१ ऑगस्टला भांडवली बाजारात सूचिबद्धता होणार आहे.

Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख

रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विलग झालेल्या या अंगाचे मूल्य अंदाजे २० अब्ज डॉलर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर गेल्या महिन्यात विशेष व्यवहार सत्र संपल्यानंतर, बाजाराने या नवागत कंपनीच्या समभागाची प्रत्येकी किंमत २६१.८५ रुपये निश्चित केली होती. त्यामुळे मात्र २१ ऑगस्ट रोजी समभागांच्या भांडवली बाजारात सूचिबद्धतेनंतर, प्रारंभिक व्यवहार याच किमतीपासून सुरू होऊन, समभागांची खरेदी-विक्री शक्य होणार आहे.

हेही वाचा – नागपूर : कन्हान नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरू

हेही वाचा – ताडोबा सफारी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२ कोटींची फसवणूक, प्रतिष्ठित कुटुंबातील २ जणांवर गुन्हा

डिमॅट खात्यात समभाग जमा

ज्या गुंतवणूकदारांच्या खात्यात २० जुलैला अथवा त्याआधीपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग होते, अशा गुंतवणूकदारांना नव्याने स्थापित जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे समभाग १ : १ (एकास एक) प्रमाणात प्राप्त झाले आहेत. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे दहा समभाग असल्यास नवीन कंपनीचेदेखील दहा समभाग प्राप्त झाले असतील. पात्र भागधारकांच्या डिमॅट खात्यात १० ऑगस्टपासून नवीन कंपनीचे निर्धारित मात्रेत समभाग जमादेखील केले गेले आहेत. मात्र जोवर समभागांची सूचिबद्धता होत नाही तोवर हे समभाग डिपॉझिटरी प्रणालीमध्ये गोठवलेल्या अवस्थेत राहतील, असे कंपनीने नियामकांना दिलेल्या विवरणांत स्पष्ट केले आहे.

Story img Loader