जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे, गणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी जिओ एअर फायबर लॉन्च होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे. जिओ एअर फायबरच्या येण्यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स इंडस्ट्रीज वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी म्हणाले की, “१० दशलक्षाहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी म्हणजेच जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो कॅम्पस आहेत, जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करणार आहे. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करीत आहोत. Jio Air Fibe लाँच केल्यामुळे Jio दररोज १.५ लाख नवीन ग्राहक जोडण्यास सक्षम असेल.”

खरं तर जिओचे ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतात १५ लाख किमीपर्यंत पसरलेले आहे. सरासरी ऑप्टिकल फायबरचा ग्राहक दरमहा २८० जीबीपेक्षा जास्त डेटा वापरतो, जो Jio च्या दरडोई मोबाईल डेटा वापराच्या १० पट आहे.

हेही वाचाः मुकेश अंबानींनी सोपवली नव्या पिढीच्या हाती कमान, आकाश-ईशाकडे RIL बोर्डात मोठी जबाबदारी, नीता अंबानी बाहेर

वार्षिक सर्वसाधारण सभेने Jio Air Fiber तसेच Jio True 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि Jio True 5G लॅबला लॉन्च करण्याची घोषणा केलीय. लॉन्चची घोषणा करताना जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, “आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करीत आहोत जे भारतीय उद्योग, छोटे व्यवसाय आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सच्या डिजिटल जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतील, असंही ते म्हणालेत.

हेही वाचाः ”५१००० हून अधिक तरुणांना अपॉइंटमेंट लेटर मिळाली,” पंतप्रधान मोदी म्हणाले, ”येत्या काळात रोजगाराच्या संधी…”

एंटरप्राइझच्या गरजा लक्षात घेऊन Jio ने 5G नेटवर्क, एज कंप्युटिंग आणि अॅप्लिकेशन्स एकत्र करून एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. दुसरीकडे ‘Jio True 5G लॅब’ मधील आमचे तंत्रज्ञान भागीदारीच्या माध्यमातून उद्योगासाठी विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करणे, चाचणी आणि सह-निर्मित करू शकतात. Jio True 5G लॅब ही नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे असणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio to launch air fiber on ganesh chaturthi mukesh ambani announcement vrd
Show comments