Nisaba Godrej Success Story : भारतातील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये २८२५ कोटी रुपयांचा करार झाला आहे. गोदरेज समूहाने रेमंड कंझ्युमर केअर कंपनी ताब्यात घेतली आहे. या करारानंतर आता रेमंडचे कामसूत्र, पार्क एव्हेन्यू सारखे ब्रँड गोदरेज केअरचा भाग बनणार आहेत. एफएमसीजी क्षेत्रासाठी ही मोठी बाब आहे. ग्राहक आधारित उत्पादने बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स आता रेमंडची कन्झ्युमर केअरचं अधिग्रहण करणार आहे. या करारामुळे गोदरेजची एफएमसीजी क्षेत्रातील भागीदारी वाढणार आहे. कोट्यवधींच्या या डीलनंतर निसाबा गोदरेज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या करारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कोण आहेत निसाबा गोदरेज?

निसाबा गोदरेज या गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांच्या कन्या आहेत. निसाबा २०१७ पासून गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ची जबाबदारी सांभाळत आहेत. कंपनीच्या चेअरपर्सन निसाबा यांच्याकडे व्यवसाय हाताळण्याचे आणि वेगाने वाढण्याचे सर्व गुण आहेत. वर्ष २०१७ पासून गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा सतत विस्तार होत आहे. १९७८ मध्ये जन्मलेल्या निसाबाचे बालपण मुंबईत गेले. निसाबा लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. सुरुवातीचे शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बीएससी केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली. २०१७ मध्ये ती तिच्या वडिलांच्या कंपनीत रुजू झाली.

PepsiCo Eyes Stake in Haldiram Snacks
हल्दीराममधील हिस्सा खरेदीसाठी ‘बहुराष्ट्रीय’ चढाओढ; पेप्सिको, टेमासेक, ब्लॅकरॉकसारख्या कंपन्या आखाड्यात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Advocate Pralhad Kokare Elected Chairman and CA Yashwant Kasar Vice-Chairman of Cosmos Cooperative Bank
कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्षपदी यशवंत कासार
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : उत्तर निसर्गकेंद्री विकासाचे…
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
Sensex retreats below 78 thousand due to selling pressure
विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची ७८ हजारांखाली पीछेहाट

हेही वाचाः Business Idea : मुख्य रस्त्याला लागून जमीन असल्यास उघडता येणार पेट्रोल पंप, भरघोस कमाई होणार, जाणून घ्या प्रक्रिया

२०१३ साली लग्न झाले

२०१३ मध्ये निसाबाने ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांच्याशी लग्न केले. कुटुंब आणि व्यवसायात त्यांनी नेहमीच समतोल राखला. त्यांना जोरान आणि एडन नावाची दोन मुले आहेत. कुटुंबालाही ती पूर्ण वेळ देते. कंपनीच्या वाढीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. २००८ मध्ये त्या गोदरेज ऍग्रोव्हेट बोर्डात रुजू झाल्या. २०१७ मध्ये जेव्हा निशाबाने गोदरेजची जबाबदारी स्वीकारली अन् अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कंपनीचे मूल्यांकन ९६०० कोटी रुपये होते. आज गोदरेज कंपनीचे मूल्यांकन ९७,५२५ कोटी आहे. एका अहवालानुसार, २०२२ मध्ये निसाबाची एकूण संपत्ती १२०० कोटी रुपये आहे.

हेही वाचाः विश्लेषण : जीडीपी वाढीनं भारत महासत्तेच्या मार्गावर अन् पाकची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर काय बदलले?

व्यवसाय वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोदरेजच्या ४ कंपन्यांमध्ये निसाबाचे शेअर्स आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२०० कोटींच्या आसपास आहे. त्यांना १.७० कोटी पगार मिळतो. कंपनीच्या सर्वात तरुण चेअरमन निसाबा यांनी कंपनीमध्ये सातत्याने अनेक बदल केले आणि कंपनीला वाढ दिली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी व्यवसायाची रणनीती बदलली. नवीन उत्पादने लाँच करणे, महसूल वाढीवर लक्ष केंद्रित करणे, ब्रँड्सचे अधिग्रहण यांसारखे महत्त्वाचे बदल केले. निसाबा गोदरेज समूहाच्या सीएसआर उपक्रमांचीही प्रमुख आहे. त्यांनी कंपनीबाबत अशी अनेक महत्त्वाची पावले उचलली, ज्यामुळे व्यवसायाला फायदा झाला.

Story img Loader