बाजारातील माणसं या सदरातील माणसांचा उल्लेख करताना आणि त्यांच्या कामाचा धावता आढावा घेताना, त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा बाजारावर काय परिणाम झाला, हे आतापर्यंतच्या लेखातून आपण पाहात आलो आहोत. लीव्हरचा अध्यक्षीय वारसा इतका मोठा आहे की, तेथे होऊन गेलेल्या प्रत्येक अध्यक्षाच्या कामाचा आढावा घेता येणे शक्य नाही.

हिंदुस्थान लिव्हरचा जन्म १९५६ ला तीन कंपन्या एकत्र येऊन भारतात झाला. त्यावेळेस कंपनीतील फक्त १० टक्के भागधारक भारतीय होते. १९५१ साली पहिला भारतीय माणूस या कंपनीचा अध्यक्ष झाला. त्यांचे नाव होते प्रकाश टंडन, नंतर १९६८ ला व्ही. जी. राजाध्यक्ष कंपनीचे अध्यक्ष झाले. कंपनीच्या व्यवसायात क्षेत्र बदल करणे, कंपनीला केमिकल व्यवसायात आणले हे महत्त्वाचे काम त्यांनी केले . १९७३ ला टी. थॉमस हे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकीर्दीत कंपनीत अनेक बदल झाले. कंपनीचे शेअर्स भांडवली बाजारात सूचीबद्ध होते, परंतु १९७८ ला १० रुपये दर्शनी किमतीच्या शेअर्सवर प्रत्येकी ६ रुपये अधिमूल्य घेऊन ते भारतीय भागधारकांना विक्री करण्यात आले. आणि त्यामुळे या कंपनीतले परदेशी गुंतवणूकदारांचे प्रमाण ६६ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकले. तर ३४ टक्के भागभांडवल देशी गुंतवणूकदारांकडे आले. या कालावधीत अध्यक्षपदी असलेल्या टी. थॉमस यांनी हा फार मोठा बदल घडवून आणला. म्हणून भारतीय भागधारक थॉमस हे नाव कधीच विसरू शकणार नाहीत. त्यानंतर मग १९८० साली डॉ. ए. एस. गांगुली कंपनीचे अध्यक्ष झाले. त्यावेळेस हिंदुस्थान लीव्हर या कंपनीमध्ये युनिलीव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीची मालकी ५१ टक्क्यांपर्यंत खाली आली होती.

savita malpekar marathi actress talks about groupism
“त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
union home minister amit shah slams sharad pawar
‘पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०० साखर कारखाने मृत्युपंथाला’, अमित शहा यांचा हल्लाबोल

हेही वाचा : Gold-Silver Price on 19 November 2023: सोन्याला पुन्हा अच्छे दिन! दर वाढण्यास सुरुवात; पाहा काय आहे आजचा भाव

टी. थॉमस हे नाव का लक्षात राहिले, तर एका वार्षिक सभेत अध्यक्ष म्हणून बोलताना थॉमस म्हणाले होते की, “सर्व ठिकाणी काही ना काही शैक्षणिक पात्रता असली पाहिजे हा जर नियम असेल तर मग लोकसभेत खासदार होण्यासाठी उभी राहणारी व्यक्ती किमान एसएससी उत्तीर्ण असावी, असा नियम करायलाच हवा.”

नंतरच्या अध्यक्षांनी लीव्हरच्या बाबतीत धाडसी निर्णय घेतले. रतन टाटा एका कार्यक्रमात बरोबर असताना टाटा ऑइल मिल्स खरेदी करण्याची लीव्हरची तयारी आहे, असे आणि डॉ. ए. एस. गांगुली यांनी त्यांना सहजपणे सांगितले. आणि ताबडतोब टाटा उद्योग समूहाचा महत्त्वाचा निर्णय झाला. टाटा ऑइल मिल्स लीव्हरकडे १९९४ साली आली. त्या अगोदर १९९३ ला ‘युनायटेड ब्रुवरिज’कडून ‘किसान’ हा ब्रँड लीव्हरकडे आला. एस. एम. दत्ता या काळात लीव्हरचे अध्यक्ष होते. १९९८ ला पॉंड्स ही कंपनी लीव्हरमध्ये विलीन करण्यात आली.

ब्रुक बॉण्डची कथा तर आणखी मजेशीर आहे. या कंपनीमुळे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात लीव्हरचे भागधारक झाले. चहाचे डेपो मॅनेजर्स कंपनीने शेअर्स दिले म्हणून पाकिटे सांभाळून ठेवायचे. जळगावला एक डेपो मॅनेजर निवृत्त झाल्यानंतर, त्यांच्या जागी नवीन आलेल्या व्यक्तीने कपाटात अगोदरच्या मॅनेजरच्या नावाची पाकिटे सापडली. त्याने त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि कागदपत्रे सुपूर्द केली. तो प्रत्यक्षात कित्येक लाखाचा खजिना होता.

हेही वाचा : Gold-Silver Price on 18 November 2023: खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर, पाहा आजचा प्रतितोळा भाव

नव्वद वर्षांच्या लिव्हरच्या आयुष्यातले खूप प्रसंग लिहिता येतील. काही चांगले, काही वाईट. परंतु पुन्हा बाजार हा मुख्य केंद्रबिंदू असून त्या संबंधातले अध्यक्षांचे निर्णय हा मुख्य धागा राहील हे भान ठेवले आहे. २००० साली एम. एस. बंगा कंपनीचे अध्यक्ष झाले. युनिलीव्हरला त्या काळात कदाचित पैशाची आवश्यकता असावी. म्हणून लीव्हरकडे असलेल्या राखीव निधीपैकी काही निधी बोनस डिंबेचर्स म्हणून वळता करण्यात आला. त्यामुळे लीव्हरच्या भागधारकांनाही राखीव निधीचे वाटप झाले. परंतु राखीव निधी अशा प्रकारे संपवल्यामुळे नंतरची काही वर्षे कंपनीला खराब गेली. कारण राखीव निधीची गुंतवणूक करून त्यातून आणखी उत्पन्न मिळवता येत होते .

काही अध्यक्षांचे गुंतवणुकीचे निर्णय चुकले. ब्रुक बॉण्डने संबंध नसलेले असे काही व्यवसाय केले. परंतु नंतर दोन पावले मागे येण्याचा निर्णयही योग्य ठरला. मॉर्डन फूड ही दिल्लीची सरकारी मालकीची कंपनी होती. ‘मम्मी मम्मी मॉर्डन ब्रेड’ अशी या कंपनीची जाहिरात होती. या कंपनीकडे जागा भरपूर होती, म्हणून लीव्हरने तिची खरेदी केली. त्यानंतर २०१५ ला निमोन फ्रूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मॉर्डन ब्रेड विकण्यात आली. २०२० ला जीएसके कन्झ्युमर प्रॅाडक्ट्स या कंपनीचे लीव्हरमध्ये विलीनीकरण केल्याने हॉर्लिक्स, बूस्टर ही उत्पादने लीव्हरकडे आली. २०२२ मध्ये लीव्हर ५० हजार कोटी रुपयांची विक्री करणारी कंपनी बनली .

के. बी. दादीसेठ यांनी मॅरिको ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मारिवाला यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे मॅरिको त्यांना घेता आली नाही. फेमकेअर ताब्यात घेण्याचे खूप प्रयत्न झाले. पण शेवटी ती कंपनी डाबरला मिळाली. मध्यंतरी एचडीएफसीला लीव्हरचे चर्चगेटचे ऑफिस खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली.

हेही वाचा : ग्राहक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेच्या कठोर निर्देशांनंतर वैयक्तिक कर्ज महागणार!

निरमाच्या करसनभाई पटेल यांनी ‘वॅाशिंग पावडर निरमा’ ही दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित होणारी जाहिरात आणि स्वस्त किमतीची धुलाई पावडर बाजारात आणून लीव्हरसारख्या महाबलाढ्य कंपनीला टक्कर दिली. परंतु याच करसनभाईंनी मॅनेजमेंट इन्स्टिटयूट स्थापन केली आणि उदघाटक म्हणून कोणाला बोलवावे तर त्या वेळचे लीव्हरचे अध्यक्ष एम. एस. बंगा यांना. आश्चर्याची गोष्ट अशी की, खिलाडू वृत्तीने बंगा यांनी ते निमंत्रण स्वीकारले देखील.

काही वर्षांपूर्वी युनिलीव्हरने भारतातल्या भागधारकांकडील शेअर बाजारभावापेक्षा जास्त भावाने किंमत देऊन खरेदी करण्याची (बायबॅक) तयारी दाखविली. परंतु त्यावेळी ज्यांनी शेअर्स विकले नाहीत, त्यांना आज एक रुपया दर्शनी किमतीचा २,५०० रुपये बाजारभाव बघायला मिळाला आहे.

लीव्हरला भारतात १७ ऑक्टोबर २०२३ ला ९० वर्षे पूर्ण झाली. ६ लाख कोटी रुपये बाजार मूल्य असेलेली ही कंपनी बाजारातील एक प्रमुख महत्त्वाची कंपनी आहे. कंपनी आणि कंपनीचे मालक हे ज्याप्रमाणे वेगळे करता येत नाहीत त्याचप्रमाणे लीव्हर आणि लीव्हरचे अध्यक्ष अर्थात व्यवस्थापक वेगळे करता येत नाहीत. त्यांचे निर्णय बाजारावर परिणाम करीत असतात. बाजारात अशीसुद्धा माणसे असावी लागतात ज्यांच्यामुळेच बाजार आणखी मोठा होतो. लीव्हर या कंपनीवर आम्ही भागधारक म्हणून गुणदोषासकट प्रेम करतो, असे म्हणणारे आमच्या सारखेच अनेक भागधारक बाजारात आहेत .

प्रमोद पुराणिक