सुरुवातीला रेडिओ, टीव्ही फार कमी लोकांकडे असायचा. तसेच यावर काही मोजक्या जाहिराती प्रेक्षकांसाठी यायच्या. तर या सगळ्यात एक प्रसिद्ध ‘दूध सी सफेदी, निरमा से आई… वॉशिंग पावडर निरमा’ ही ९० च्या दशकातील गाजलेली जाहिरात आजही प्रत्येकाला तोंडपाठ आहे. ही जाहिरात ऐकली तरीही आपल्या डोळ्यासमोर येते ती एक पांढरा फ्रॉक घातलेली चिमुकली; जी प्रत्येकाला स्वच्छतेचा अर्थ समजावून सांगायची. तर आज आपण या प्रसिद्ध जाहिरातीची आणि बिझनेसमॅनची रंजक गोष्ट रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निरमाच्या या वॉशिंग पावडरची कहाणी गुजरात येथून सुरू होते. निरमाच्या जाहिरातीमागे उद्योजक करसनभाई पटेल यांचे दृढनिश्चय, नवकल्पना आणि कठोर परिश्रम आहेत. गुजरातच्या अहमदाबाद येथे राहणारे करसनभाई पटेल यांनी ही कंपनी सुरू केली होती. १९६९ मध्ये सुरू झालेली ही कंपनी आज कोट्यवधींची मल्टिनॅशनल कंपनी म्हणून ओळखली जाते.१९६० मध्ये करसनभाई पटेल यांनी गुजरात सरकारच्या खाण आणि भूविज्ञान विभागात रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले. याच काळात त्यांनी बाजारपेठेतील स्वस्त आणि प्रभावी डिटर्जंटचे अंतर ओळखले. त्या वेळी मार्केटमध्ये डिटर्जंट कंपनीच्या बहुराष्ट्रीय ब्रँडचे वर्चस्व होते, जे सरासरी भारतीय कुटुंबातील लोकांसाठी महाग होते.

हेही वाचा…कंपन्यांसाठी चिंताजनक निष्कर्ष! २८ टक्के कर्मचारी वर्षभरात नोकरी सोडण्याच्या तयारीत; BCG सर्वेक्षणाचा निष्कर्ष!

१९६९ मध्ये करसनभाई पटेल यांनी ७०० रुपयांचे लोन काढून त्यांच्या घराच्या मागील अंगणात डिटर्जंट पावडर तयार करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी त्यांच्या उत्पादनाचे नाव “निरमा” ठेवले, जे त्यांची मुलगी निरुपमा हिच्या नावावरून घेतले गेले आहे. निरमा ही वॉशिंग पावडर खास ठरली, ती म्हणजे त्याची गुणवत्ता आणि परवडणारी क्षमता. करसनभाई पटेल यांनी सामान्य माणसाच्या गरजा समजून घेतल्या आणि त्यांच्या उत्पादनाची किंमत मार्केटमधील इतर ब्रँडच्या स्पर्धेपेक्षा कमी ठेवली; ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत सहज पोहोचले.

करसनभाई पटेल यांनी सुरुवातीला वैयक्तिकरित्या घरोघरी जाऊन निरमाची जाहिरात केली आणि थेट ग्राहकांना डिटर्जंट विकले. या खास गोष्टीमुळे त्यांना बाजारपेठ समजण्यास मदत झाली. तसेच निरमासाठी टर्निंग पॉइंट म्हणजे “वॉशिंग पावडर निरमा” ही जाहिरात; जी संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रिय झाली. टीव्ही, रेडिओवर या जाहिरातीने काही वेळात अनेकांचं लक्ष वेधून घेतले. उत्‍पादनाची गुणवत्ता, स्वस्त किंमत या बरोबरच आकर्षक जाहिरातीने निरमाला डिटर्जंट मार्केटमध्‍ये शीर्षस्थानी नेले. तसेच निरमाचे यश वाढत असताना, करसनभाई पटेल यांनी साबण, डिटर्जंट आदी वस्तूंसह विविध उत्पादनेसुद्धा बाजारात आणली. छोट्या गावातून कोट्यवधी ब्रँडचे साम्राज्य निर्माण करण्याचा हा प्रवास खरोखरच एक प्रेरणादायी गोष्ट आहे. तसेच करसनभाई पटेल यांचा वारसा जगभरातील इच्छुक उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे…

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey of karsanbhai patel business success story by taking loan to multi billion band asp