वृत्तसंस्था, सॅनफ्रान्सिस्को

आर्थिक अडचणीत सापडलेल्या फर्स्ट रिपब्लिक बँकेसाठी जेपीमॉर्गन चेस अँड कंपनीने यशस्वी बोली लावली आहे. त्यामुळे बँकेचा ताबा जेपीमॉर्गनकडे येणार आहे. सरकारच्या नेतृत्वाखाली हस्तक्षेप करून ही बँक वाचवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या बँकेची अखेर विक्री करण्यात आली आहे.

Sensex retreats below 78 thousand due to selling pressure
विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची ७८ हजारांखाली पीछेहाट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी
man from nalasopara duped of rs 45 lakh on pretext of starting a gold company
दुबईत सोन्याची कंपनी सुरू करण्याची थाप; त्रिकुटाने घातला ४५ लाखांचा गंडा
Torres Jewelry House scam investment a new pattern of fraud foreign company
टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली?
New Ipo In share market : Standard Glass Lining IPO
Standard Glass Lining IPO : दमदार कमाई करून देणार हा आयपीओ, गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल, जाणून घ्या, कशी करावी नोंदणी?
How to choose a mutual fund, mutual fund,
फंडभान : म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी?
top 500 companies cash of rupees 7 68 lakh crores
शेअर बाजारातील कंपन्यांकडे आहे भरपूर पैसा, अव्वल ५०० कंपन्यांच्या ताळेबंदात ७.६८ लाख कोटींची रोकड

जेपीमॉर्गनकडून फर्स्ट रिपब्लिक बँकेची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. यात १७३ अब्ज डॉलरची कर्जे, ३० अब्ज डॉलरचे रोखे आणि ९२ अब्ज डॉलरच्या ठेवींचा समावेश आहे. हा व्यवहार पूर्णत्वास जाण्यास फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने महत्वाची भूमिका बजावली. बँकेच्या व्यावसायिकसह इतर कर्जांचा तोट्याचा भार, वसुली या दोन्ही संस्था विभागून घेणार आहेत.

आणखी वाचा-मोठ्या कंपन्यांना बँकिंग परवानगी नाहीच: बँकिंगतज्ज्ञ नारायणन वाघूल

याबाबत जेपीमॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमॉन म्हणाले की, सरकारने आम्हाला आमंत्रित केले आणि इतरांना बाहेर पडण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही पुढे पाऊल टाकले. आमची वित्तीय ताकद, क्षमता आणि व्यवसायाची पद्धती यामुळे आम्ही ही बोली लावून हा व्यवहार पार पाडू शकलो. याचबरोबर डिपॉझिट इन्शुरन्स फंडाचा खर्चही आम्ही कमीत कमी केला आहे.

भांडवली बाजारात संमिश्र प्रतिक्रिया

फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या व्यवहाराच्या बातमीनंतर न्यूयॉर्कमध्ये भांडवली बाजार सुरू होण्यापूर्वीच्या सत्रात बँकेचा समभाग ३३ टक्क्यांहून अधिक कोसळला. याचवेळी जेपीमॉर्गनच्या समभागात ३.८ टक्के वाढ झाली. चालू वर्षात फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या समभागात ९७ टक्के घसरण झाली आहे.

Story img Loader