मुंबई: जेएसडब्ल्यू समूहातील कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सोमवारी तिच्याद्वारे संचालित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जयगड आणि धरमतर या बंदरांच्या क्षमता विस्तारासाठी २,३५९ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला सोमवारी मान्यता दिली.

सध्याची १७० दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष माल हाताळणी क्षमता आर्थिक वर्ष २०३० पर्यंत प्रति वर्ष ४०० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याच्या कंपनीच्या योजनेचा एक भाग म्हणून हा क्षमता विस्तार हाती घेण्यात आला आहे. प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीतून प्रति वर्ष ३६ दशलक्ष टनांची क्षमतेत भर पडणे अपेक्षित असून, जयगड बंदराच्या क्षमतेत १५ दशलक्ष टनांची, तर धरमतर बंदराच्या क्षमतेत वार्षिक २१ दशलक्ष टनांनी वाढ होईल, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
MHADA mega list draw scam No inquiry report on draw even after year
म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात
National Book Trust is expanding across India with offices opening in Pune cities
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण
knight frank report, Private investment Mumbai ,
मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती
mumbai Eastern Express Highway
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान, १८० मीटरची मिसिंग लिंक पूर्ण; सोमवारपासून मार्ग सेवेत
Devendra Fadnavis
Metro 3 : मुंबईतील १७ लाख प्रवाशांना होणार फायदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मुंबई मेट्रो ३ ची अपडेटेड माहिती!
4 new Cemetery in panvel
चार नवीन स्मशानभूमींसाठी पनवेल महापालिकेचा १० कोटींचा निधी

हेही वाचा >>> Adani Group: अदाणी समूहाचा बांगलादेशला इशारा; “गोड्डा वीज प्रकल्पाची ५० कोटी डॉलर्सची थकबाकी…”!

विस्तार योजनेत नवीन धक्क्यांसाठी यांत्रिक, नागरी आणि इलेक्ट्रिकल कामांचा समावेश आहे आणि तृतीय-पक्षाच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जयगड बंदरासाठी रेल्वे साइडिंगसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या विकसनाचाही यात समावेश आहे. कंपनीने निवेदनांत दिलेल्या माहितीनुसार, विस्तारापश्चात जयगड बंदराची एकूण क्षमता सध्याच्या वार्षिक ५५ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ७० दशलक्ष टनांवर जाईल आणि धरमतर बंदराची क्षमता सध्याच्या वार्षिक ३४ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, ५५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढेल. या विस्तार योजनेचे उद्दिष्ट प्रामुख्याने डोलवी, महाराष्ट्र येथे प्रस्तावित ५० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या पोलाद निर्मिती सुविधेतून वाढलेल्या मालवाहतुकीच्या गरजांची पूर्तता केली जाईल. दोन्ही बंदरांच्या विस्तारामुळे अंदाजे वार्षिक २७ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत अतिरिक्त माल हाताळणी क्षमता निर्माण होऊ शकेल. दोन्ही बंदरांबाबत प्रस्तावित विस्तार योजनेतील बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Story img Loader