मुंबई : गुजरातस्थित पॉलिमरआधारित उत्पादनांची निर्माता काका इंडस्ट्रीजची प्रारंभिक समभाग विक्री सोमवार, १० जुलैपासून ते १२ जुलै यादरम्यान सुरू राहील. मुंबई शेअर बाजाराच्या ‘बीएसई एसएमई’ या लघू व मध्यम उद्योगासाठी स्थापित विशेष बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या या भागविक्रीतून २१.२३ कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

हेही वाचा >>> जग्वार लँड रोव्हरच्या विक्रीत २९ टक्के वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येकी ५५ रुपये ते ५८ रुपये या किंमतपट्ट्यादरम्यान काका इंडस्ट्रीजच्या समभागांसाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. गुंतवणूकदारांना किमान २००० समभागांसाठी आणि त्यानंतर त्याच पटीत समभागांची मागणी नोंदवणारा अर्ज सादर करावा लागेल. हेम सिक्युरिटीज हे या भागविक्रीचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. वेगाने विस्तारत असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात पार्टिशन, फॉल्स सीलिंग, वॉल पॅनेलिंग, किचन कॅबिनेट, खिडकी, दरवाजे आणि फर्निचर घटकांमध्ये कंपनीच्या पीव्हीसी आणि इतर उत्पादनांना किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही पर्याय म्हणून चांगली मागणी मिळत आहे.