पुणे : भारत फोर्ज समूहातील कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स या उपकंपनीने अमेरिकेतील एएम जनरल आणि मँडस ग्रुप या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या माध्यमातून अत्याधुनिक तोफा मंच विकसित करून त्यांचे उभयतांकडून उत्पादन केले जाणार आहे. सैन्याच्या गरजा लक्षात घेऊन हलक्या वजनाच्या, छोट्या आणि टिकाऊ तोफांसाठी मंच विकसित केला जाणार आहे. हा मंच सहजी कुठेही हलवता येईल, अशी त्याची रचना असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘केआरएन हीट’कडून गुंतवणूकदारांना पदार्पणालाच ११७ टक्के परतावा

याचबरोबर सर्व प्रकारच्या वातावरणात तो कार्य करू शकेल. अधिक ताकदवान, अचूक लक्ष्यभेद आणि अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा असलेल्या तोफांच्या आवश्यकतेवर या भागीदारीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे. प्रामुख्याने १०५ मिलिमीटर आणि १५५ मिलिमीटर अत्याधुनिक तोफांसाठी मंच विकसित केले जाणार आहे. नवीन तोफांच्या मंचात क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करावा लागेल, यावर यात विशेष भर देण्यात येईल. या मंचाच्या माध्यमातून हॉवित्झर तोफांना अधिक दारूगोळ्याचा पुरवठा होऊनही हा मंच हलक्या वजनाचा असेल. त्याची वाहतूकही सहजपणे शक्य होईल, असे भारत फोर्जने म्हटले आहे.