पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदोष इलेक्ट्रॉनिक तेल पंप नियंत्रक आढळल्यामुळे दक्षिण कोरियाची वाहन निर्मात्या किआने तिची पेट्रोलवर धावणारी ४,३५८ ‘सेल्टोस’ वाहने माघारी घेण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. २८ फेब्रुवारी ते १३ जुलै २०२३ या कालावधीत निर्मित आयव्हीटी ट्रान्समिशनसह स्मार्टस्ट्रॅम जी १.५ पेट्रोल सेल्टोस वाहनांचा यात समावेश आहे.

भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला वाहने माघारी बोलवण्याच्या ऐच्छिक निर्णयाबद्दल कंपनीने माहिती दिली आहे. वाहन मालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने आणि वाहनाच्या चांगल्या अनुभवासाठी कंपनी या माघारी बोलावलेल्या वाहनांमध्ये विद्युत तेल पंप नियंत्रक बदलून देत आहे, असे ‘किआ इंडिया’ने प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे. कंपनी संबंधित वाहन-मालकांशी थेट संपर्क साधून त्यांना या निर्णयाबद्दल माहिती देणार आहे. सध्या किआ भारतीय बाजारपेठेत सेल्टोससह, सोनेट आणि केरेन्स या वाहनांची विक्री करते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kia india recalled 4358 seltos vehicles print eco news amy