पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या किआ इंडियाने येत्या १ एप्रिलपासून वाहनांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.वाहन निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ आणि नियामक बदलांमुळे एकूण खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किमती वाढविणे भाग ठरले.

मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असे किआ इंडियाचे विक्री आणि वितरण प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी सांगितले.किआ देशात सेल्टोस, सोनेट आणि केरेन्ससारख्या वाहनांची विक्री करते. आजवर तिची देशात आणि परदेशात मिळून सुमारे ११.६० लाख वाहने विकली गेली आहेत.