UST new facility in Pune add 6,000 jobs : अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तन उपाय क्षेत्रातील ‘यूएसटी’ या कंपनीने पुणे शहरात मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकेमुळे पुणे शहरात रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीची पुढील ३ ते ५ वर्षांत पुण्यात सुमारे ३ हजार ५०० ते ६ हजार नोकऱ्या निर्माण करण्याची योजना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणारी ही कंपनी नेमकं करते काय? याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

तंत्रक्षान क्षेत्रातील या बड्या कंपनीमध्ये डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोग यातील सखोल तज्ज्ञतेचा उपयोग करून नाविन्याला चालना दिली जात आहे. ज्याच्या माध्यमातून व्यावसायांच्या वाढीमध्ये या कंपनीकडून मदत केला जाते. फिनटेक, हेल्थकेअर व लाइफ सायन्स, रिटेल व ई-कॉमर्स, उत्पादन व ऑटोमोटिव्ह यांसारख्या उद्योगांतील आघाडीच्या जागतिक कंपन्यांना यूएसटीकडून सेवा पुरवल्या जातात. यूएसटी कंपनी त्यांच्या जगभरातील ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कंपनी नेमकं करते काय?

यूएसटी (UST) ही एक प्रमुख तंत्रज्ञान आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यासाठी आवश्यक असलेल्या सेवा पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी मूळची अमेरिका येथील असून या कंपनीचा सेवांच्या माध्यमातून कंपन्यांना त्यांच्या व्यवसाय प्रक्रियेतील डिजिटल परिवर्तनासाठी मदत केली जाते.

कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, यूएसटी ही कंपन्यांना त्यांच्या व्यवसाय प्रक्रियांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून त्यांच्या कार्यशैलीत सुधारणा करण्यात मदत करते. यामध्ये क्लाऊड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), आणि मशिन लर्निंग यांचा समावेश होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनच्या क्षेत्रात यूएसटी, एआय आणि रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचा वापर करून व्यवसायांच्या कामांमध्ये सुधारणा करते. तसेच कार्यपद्धती सुधारण्यासाठी यूएसटीकडून क्लाऊड सोल्यूशन्स सेवा देखील पुरवल्या जातात. यूएसटीकडून डेटा अॅनालिटिक्स आणि सायबरसुरक्षा. कस्टमर एक्सपीरियन्स यामध्ये देखील कंपन्यांना मदत पुरवली जाते. याबरोबरच यूएसटी वित्त, आरोग्य, रिटेल, ऊर्जा, आणि टेलिकॉम, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवसायांना त्यांच्या कार्य पद्धतीत सुधारणा करण्यात मदत करते.

कंपनीचा पुण्यात विस्तार

कंपनीने पुणे येथे नवे कार्यालय सुरू केले असून याच्या माध्यमातून कंपनीकडून त्यांच्या सेवांचा विस्तार केला जात आहे. पुण्यातील बालेवाडी येथील ईक्यू स्मार्टवर्क्स संकुलात कंपीनने नवीन कार्यालय सुरू केले आहे. येथे ८० हजार चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. तसेच येथे एक हजारपेक्षा जास्त आसनक्षमता आहे. ‘यूएसटी’च्या ‘पुणे सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये सध्या दोन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

देशभरात २० हजारांहून अधिक कर्मचारी

पुढील तीन वर्षांत ‘यूएसटी’ भारतातील आपल्या कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्येत सातत्यपूर्ण वाढ करणार आहे. कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेली यूएसटी ही १९९९ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून, भारतातील तिचे मुख्यालय तिरुअनंतपुरम येथे आहे. बंगळुरू, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, कोची, पुणे, मुंबई, चेन्नई, कोइमतूर, दिल्ली, अहमदाबाद आणि होसूर यांसारख्या प्रमुख ठिकाणी तिची कार्यालये आहेत. सध्या भारतात २० हजारांहून अधिक कर्मचारी ‘यूएसटी’सोबत कार्यरत आहेत.