kotak bank debit card charges : खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने डेबिट कार्ड सुविधेसाठी वार्षिक शुल्कात वाढ केली आहे. नवीन नियम २२ मे २०२३ पासून लागू होणार आहे. कोटक महिंद्रा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क सध्या १९९ रुपये अधिक GST आकारले जात आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना २२ मेपासून डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ करण्याबाबत मेल पाठवला आहे. डेबिट कार्ड व्यतिरिक्त कोटक महिंद्रा बँकेने इतर सेवांवरही शुल्क वाढवले ​​आहे. यामध्ये किमान बॅलन्स न ठेवणे, व्यवहार अयशस्वी होणे, संबंधित व्यवहार तपासणे इत्यादीसाठी हे शुल्क कोटक महिंद्रा बँकेच्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून वसूल केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेबिट कार्डवर आता वार्षिक शुल्क किती असेल?

कोटक महिंद्रा बँकेने डेबिट कार्ड वार्षिक शुल्काच्या विद्यमान दरात ६० रुपयांची वाढ केली आहे. सध्या हे शुल्क १९९ रुपये अधिक जीएसटी दराने घेतले जात आहे. दुसरीकडे २२ मे २०२३ पासून तुम्हाला कोटक महिंद्रा बँक डेबिट कार्डवर २५९ रुपये वार्षिक शुल्क आणि GST भरावा लागेल. याशिवाय डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास नवीन कार्ड घेण्यासाठी तुम्हाला २०० रुपये द्यावे लागतील. तुमच्या खात्यातील अपुर्‍या शिलकीमुळे व्यवहार फेल झाल्यास तुमच्याकडून प्रति व्यवहार २५ रुपये आकारले जातील. तसेच दरमहा एकापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 10 रुपये द्यावे लागतील.

हेही वाचाः एलपीजी सिलिंडरची दरकपात ते एटीएमवर बँकेकडून आकारण्यात आलेले शुल्क, आजपासून बदलले हे चार नियम!

किमान बॅलन्स न ठेवल्याबद्दल इतके शुल्क आकारले जाणार

तुम्ही तुमच्या कोटक महिंद्रा बँक खात्यात किमान बॅलन्स ठेवू शकत नसल्यास बँक ६% पर्यंत शुल्क आकारू शकते. याशिवाय प्रत्येक वेळी चेक जारी करताना आणि गैर-आर्थिक कारणांसाठी परत केल्यावर ५० रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच जमा केलेल्या आणि परत केलेल्या चेकसाठी प्रत्येकी २०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बँकेच्या महत्त्वाच्या सूचना (SI) न पाळल्याबद्दल २०० रुपये आकारले जातील.

हेही वाचाः वयाच्या २३ व्या वर्षी शेअर बाजारातून कमावले १०० कोटी; १२ वी पास मुलगा झाला करोडपती, कोण आहे संकर्ष चंदा?

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kotak bank increases debit card annual fee the new rates will be effective from 22 may 2023 vrd