पीटीआय़, नवी दिल्ली
हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समभागांमध्ये झालेल्या पडझडीतून ‘शॉर्ट सेलिंग’द्वारे नफा मिळवण्यासाठी ऑफशोअर फंड तयार करणाऱ्या आणि त्याची देखरेख करणाऱ्या ज्या संस्थेचा ‘सेबी’ने कारणे दाखवा नोटीशीत उल्लेख केला आहे ती प्रतिष्ठित बँकर उदय कोटक यांची कोटक बँकच आहे, असा खुलासा हिंडेनबर्ग रिसर्चने मंंगळवारी केला आणि या प्रकरणाशी निगडित आणखी एक नवीन पैलू पुढे आणला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘सेबी’ने हिंडेनबर्गला २७ जूनला धाडलेल्या ४६ पानी कारणे दाखवा नोटीशीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्गचा अदानी समूहावरील आरोपांचा अहवाल येण्याच्या काही दिवस आधीच एका परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदाराकडून या कालावधीत झालेल्या व्यापाराचे प्रारंभिक विश्लेषण केल्याचे म्हटले आहे. ‘के इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड’ या नावाच्या फंडात स्वत: हिंडेनबर्गने व्यापार खाते उघडले आणि अहवाल प्रकाशित होण्याच्या काही दिवस अगोदर अदानी एंटरप्राइज लिमिटेडच्या (एईएल) समभागांमध्ये व्यापार सुरू केला आणि नंतर अहवालाच्या प्रकाशनानंतर तिने तिचा संपूर्ण ‘शॉर्ट’ पवित्रा बंद (स्क्वेअर-ऑफ) केला, ज्यातून तिला १८३.२४ कोटी रुपयांचा नफा झाला. या कथित सट्टेबाजी आणि नियम उल्लंघनाबद्दल हिंडेनबर्गला नियामकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तथापि या ‘के इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंडा’मधील ‘के’ हे उदय कोटक यांच्या कोटक बँकेचेच संक्षिप्त रूप असल्याचे हिंडेनबर्गने दिलेल्या खुलाशात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>बाजार अस्थिरतेत गुंतवणूक कशी कराल? मुंबई विद्यापीठाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे आयोजन
हिंडेनबर्गचे म्हणणे हे की, ‘आमच्यावर हेत्वारोप करताना, सेबीच्या नोटीशीचे भारताशी थेट संबंध असलेल्या संस्थेचा सुस्पष्ट नामोल्लेख व ते उघड करण्यातील अपयश संशयास्पद आहे. कोटक बँक ही उदय कोटक यांनी स्थापन केलेली भारतातील सर्वात मोठी बँक आणि दलाली पेढ्यांपैकी एक आहे. जिने आमच्या गुंतवणूकदार भागीदारांना अदानींच्या समभागांमध्ये व्यवहारासाठी ऑफशोअर फंडाची निर्मिती आणि देखरेख केली. के-इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाच्या नावात ‘के’ हे संक्षिप्त रूप म्हणजे ‘कोटक’ हे नाव झाकणारा मुखवटाच असल्याचे नमूद करीत, ‘सेबी’नेही ते नाव झाकलेले राहिल हे पाहिल्याचा हिंडेनबर्गचा आरोप आहे.
न्यूयॉर्कस्थित या शॉट सेलर संस्थेने अदानींच्या समभागांच्या पडझडीचा सौदा केल्याचे कबूल केले, मात्र यातून अवघे ४० लाख अमेरिकी डॉलरच कमावल्याचे म्हटले आहे. दोन वर्षे चाललेले संशोधन, त्यासाठी संशोधकांचे वेतन व भत्ते आणि अन्य वरखर्च यापेक्षा अधिक होता, असा तिचा दावा आहे.
कोटक समूहाचे म्हणणे काय?
कोटक महिंद्र इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने हा ऑफशोअर फंड तयार केला. तिच्याकडे खाते उघडणाऱ्या गुंतवणूकदारांत हिंडेनबर्गचे नाव कधीच नव्हते. ते कोणा गुंतवणूकदाराचे भागीदार आहेत, याचीही फंडाला कल्पना नव्हती. तर सेबीच्या कारणे दाखवा नोटीशीमध्ये किंगडन कॅपिटलचा उल्लेख आहे. जो हिंडेनबर्गशी संलग्न असल्याचा संशय आहे आणि ज्याला अदानींवरील आरोपांच्या अहवालाची तो प्रकाशित होण्यापूर्वीच माहिती असण्याची शक्यता आहे. तथापि असा कोणता अहवाल येत असल्याचे कोटक फंडाच्या कोणाही अधिकारी व्यक्तीला माहिती नव्हती, असे कोटक महिंद्र बँकेने खुलाशादाखल म्हटले आहे. के-इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड लिमिटेड ही सेबी-नोंदणीकृत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार संस्था आहे आणि मॉरिशसच्या वित्तीय सेवा आयोगाद्वारे तिचे नियमन केले जाते, असेही प्रवक्त्याने सांगितले. ग्राहक नोंदवताना योग्य ‘केवायसी’ प्रक्रियेचे पालन केले जाते आणि फंडाची सर्व गुंतवणूक लागू कायद्यांनुसार होत असते.