मुंबई : वातानुकूलित यंत्रणांसाठी सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या ‘केआरएन हीट एक्सचेंजर’च्या समभागाने गुरुवारी बाजार पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ११७ टक्के परतावा दाखवला. बाजारात प्रमुख निर्देशांकात मोठी पडझड होऊन देखील या नवागत समभागाने गुंतवणूकदारांना स्वप्नवत परतावा दिला.

गेल्या आठवड्यात सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे प्रत्येकी २२० रुपयांना गुंतवणूकदारांनी मिळविलेल्या या समभागाच्या गुरुवारी सकाळी शेअर बाजारात नोंदणी होताच, त्याने ४७० रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले. नंतरच्या व्यवहारात तो ५१३.५० रुपयांपर्यंत झेपावला. दिवसअखेर समभाग वितरित किमतीच्या तब्बल ११७.६३ टक्के अधिमूल्य म्हणजेच २५८.६९ रुपयांच्या वाढीसह ४७८.७९ रुपयांवर स्थिरावला. पदार्पणातील या चमकदार कामगिरीमुळे ‘केआरएन हीट एक्सचेंजर’च्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजार भांडवल २,२०८ कोटी रुपये झाले आहे.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!

हेही वाचा >>> Sensex Today: आधी मोठी झेप, आता घसरण; सेन्सेक्स बाजार उघडताच ८४५ अंकांनी कोसळला; Nifty50 ही घसरला!

‘केआरएन हीट’ची प्रारंभिक समभाग विक्री २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरदरम्यान पार पडली होती. यासाठी कंपनीने २०९ रुपये ते २२० रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून तिने ३४२ कोटी रुपये उभारले आहेत. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या जबरदस्त सहभागामुळे कंपनीच्या आयपीओला अखेरच्या दिवशी २१४ पटींहून अधिक प्रतिसाद प्राप्त झाला होता. ‘केआरएन हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशन’ ही राजस्थानमधील कंपनी असून हीट एक्सचेंजर्सची आघाडीची उत्पादक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये ट्यूब-टाइप हीट एक्सचेंजर्स, तांबे आणि ॲल्युमिनियम फिन, कॉपर ट्यूब, वॉटर कॉइल्स, कंडेन्सर कॉइल आणि बाष्पीभवन करणाऱ्या कॉइल यांचा समावेश होतो. ही उत्पादने प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील हीटिंग, वेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशनप्रणालींमध्ये वापरली जातात. डायकिन एअर कंडिशनिंग, श्नाइडर इलेक्ट्रिक, किर्लोस्कर चिलर्स, ब्लू स्टार, क्लायमाव्हेंटा क्लायमेट टेक्नॉलॉजीज आणि फ्रिजेल इंटेलिजेंट कूलिंग सिस्टम्स इंडिया यासारख्या आघाडीच्या तिच्या ग्राहक कंपन्या आहेत.