मुंबई: भांडवली बाजारातील भीतीदायी अस्थिरता आणि निरंतर झोडपले जात असलेले मिड व स्मॉल कॅप समभागांची दीनवाणी अवस्था पाहता, गुंतवणूकदारांनी तुलनेने सुरक्षित लार्ज कॅपमध्ये गुंतवणुकीला वळवून सूज्ञतेचा उत्तम उदाहरण प्रस्तुत केल्याचे ‘ॲम्फी’च्या आकडेवारीने बुधवारी स्पष्ट केले. सरलेल्या जानेवारीमध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये ३,७५१ कोटी रुपयांची मासिक गुंतवणूक झाली.

लार्जकॅप समभागांत गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांमधील जानेवारी २०२५ मधील ओघ ५२.३ टक्क्यांनी वाढून ३,०६३ कोटी रुपयांवर गेला. जी या योजनांमधील आजवरची दुसऱ्या क्रमांकाची विक्रमी मासिक गुंतवणूक आहे. सोन्यातील दमदार भाव तेजी पाहता, ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये देखील जानेवारीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक ३,७५१ कोटी रुपयांची मासिक गुंतवणूक झाली. तरीही जानेवारीमध्ये मिडकॅप श्रेणीमध्ये ५,१४८ कोटी रुपये, तर स्मॉलकॅप श्रेणीमध्ये ५,७२१ कोटी रुपयांचा ओघ राहिला. जो महिनागणिक कमी झाला असला तरी लार्ज कॅप फंडांमधील गुंतवणुकीच्या तुलनेत जास्तच होता, असे ‘ॲम्फी’च्या आकडेवारीने स्पष्ट केले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation budget 2025 news in marathi
पिंपरी: पालिकेच्या उत्पन्नात घट; अर्थसंकल्पात मात्र फुगवटा;  कशी आहे आर्थिक स्थिती?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Pune-Baramati team performs strongly in Mahavitaran State Sports Championship
महावितरण राज्य क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती संघाची दमदार कामगिरी; २१ सुवर्ण, ९ रौप्यपदकांची कमाई
Hexaware Technologies IPO news in marathi
टीसीएसनंतर ‘या’ आयटी कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येतोय; जाणून घ्या किंमत
state bank of india net profit of rs 16891 crore for 3q
देशातील सर्वात मोठ्या ‘या’ बँकेला १६,८९१ कोटींचा निव्वळ नफा; डिसेंबर तिमाहीत ८४ टक्क्यांची वाढ
EPFO settles record over 5 crore claims in FY25
‘ईपीएफओ’कडून दोन लाख कोटी रुपयांचे दावे निकाली
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
Companies urged to pay better salaries 53 percent of highly educated graduates protest
चांगले वेतन देण्याचे कंपन्यांना आर्जव; उच्चशिक्षित ५३ टक्के पदवीधरांची बोळवण

समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणूक जानेवारीत ३.६ टक्क्यांनी घटून ३९,६८८ कोटी रुपये झाली. डिसेंबर २०२४ मध्ये इक्विटी फंडांत ४१,१५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया अर्थात ‘ॲम्फी’ने जाहीर आकडेवारीनुसार, इक्विटी फंडात सलग ४७ व्या महिन्यांत गुंतवणूक प्रवाह राहिला आहे.

जानेवारीअखेर नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून २६,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक आली, जी डिसेंबरमधील २६,४५९ कोटी रुपयांच्या योगदानापेक्षा किंचित घटली आहे. तथापि देशातील सर्व म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील ‘एसआयपी’ मालमत्ता १३.२ लाख कोटी रुपयांवर गेली आहे, जी एकूण गुंतवणूक मालमत्तेच्या पाचवा हिस्सा (एक-पंचमांश) इतकी आहे.

भांडवली बाजाराची मंदावलेली कामगिरी आणि प्रचंड अस्थिरता असतानाही ‘एसआयपी’ योगदान जवळपास स्थिर राहिले आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू ठेवली जावी इतकी सूज्ञता गुंतवणूकदारांनी निश्चित मिळविली आहे.

वेंकट चालसानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲम्फी

Story img Loader