Banks Revised Fixed Deposit Rates : आरबीआयने रेपो दर काही महिन्यांसाठी जैसे थे ठेवला आहे. रेपो दर स्थिर ठेवण्याच्या बँक नियामकाच्या निर्णयानंतर अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केलेला नाही. परंतु खालील बँकांनी मे 2023 मध्ये त्यांचे मुदत ठेव व्याजदर वाढवले किंवा बदलले आहेत. अशाच बँकांचे नवे FD दर पाहू यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

DCB बँकेचा FD दर किती?

२ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी DCB बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केले आहेत. DCB बँकेच्या वेबसाइटनुसार, ८ मे २०२३ रोजी नवीन दर लागू होतील. सुधारणेचा परिणाम म्हणून बँक आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवर ८.५ टक्के आणि नियमित ग्राहकांसाठी ८ टक्के व्याजदरासह एफडी ऑफर करते.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एफडी देतेय इतका फायदा

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने १ ते ५ वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ४९ ते १६० bps ने सुधारित केले आहेत. सुधारित दर ५ मे २०२३ पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर २ कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर बँक आता ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या मुदतीसह सर्वसामान्यांना ४ टक्के ते ९.१ टक्के दराने आणि ज्येष्ठांना ४.५ टक्के ते ९.६ टक्के दराने फायदा देते.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक एफडी दर मिळतोय लाभ

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात २ मे २०२३ पासून बदल केला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, आता ते ज्येष्ठ नागरिकांना किमान १००१ दिवसांसाठी ठेवलेल्या मुदत ठेवींवर दरवर्षी ९.५ टक्के दराने जास्तीत जास्त व्याज प्रदान करते, तर नियमित नागरिकांना त्याच कालावधीसाठी दरवर्षी ९ टक्के दराने व्याज मिळते.

मुदत ठेवींमधून मुदतपूर्व पैसे काढल्यास भरावा लागणार दंड

मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी ज्यातून लवकर पैसे काढले जातात, त्या बँकेने ठेव ठेवलेल्या वेळेसाठी लागू दराच्या 1 टक्के लवकर पैसे काढण्याच्या दंडाच्या अधीन असतात किंवा करार केलेल्या दराच्या अधीन असतील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest fd rates 2023 these banks changed fixed deposit rates in may how much benefit are you now vrd
Show comments