चीप निर्माता कंपनी इंटेलने यूएसमध्ये किमान १४० हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे, ज्यात फॉलसम आर अँड डी कॅम्पसमधील ८९ आणि कॅलिफोर्निया येथील सॅन जोस ऑफिसमधील ५१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सॅक्रामेंटो इनोच्या अहवालानुसार, नवीन नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. कंपनीला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागत असल्यानं कर्मचारी कपात करण्यात आली असून, ती महिन्याच्या शेवटी प्रभावी होणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीने सांगितले की, १० GPU सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंते, आठ सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंते, सहा क्लाऊड सॉफ्टवेअर अभियंते, सहा उत्पादन विपणन अभियंते आणि सहा सिस्टीम ऑन चिप डिझाइन अभियंते यांना काढून टाकत आहे. या नव्या नोकर कपातीमुळे चालू वर्षात इंटेलने फॉलसम R&D कॅम्पसमधील अंदाजे ५०० पदे काढून टाकणार आहे. टॉमच्या हार्डवेअरनुसार, २०२२ च्या सुरुवातीला फॉलसममध्ये इंटेलचे ५,३०० कर्मचारी असतील.

हेही वाचाः जिओ फायनान्शिअलचा शेअर २६५ रुपयांवर लिस्ट; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Intel च्या Folsom कॅम्पसचा वापर विविध R&D हालचालींसाठी केला गेला आहे, ज्यामध्ये SSD, ग्राफिक्स प्रोसेसर, सॉफ्टवेअर आणि चिपसेटचा समावेश आहे. यंदा मेमध्ये चिप निर्मात्याने सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. त्यानंतर आव्हानात्मक मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणात खर्च कमी करण्यासाठी त्यांचे कर्मचारी आणखी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु येत्या काळात किती कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील हे अद्यापही कंपनीनं स्पष्ट केलेले नाही.

हेही वाचाः कांद्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न; आजपासून २५ रुपये किलोनं विकणार

अहवालात इंटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही खर्चात कपात करण्यावर आणि कंपनीच्या क्षेत्रांमध्ये विशिष्ट व्यवसाय आणि विशिष्ट कर्मचारी कपातीसह अनेक उपक्रमांद्वारे कार्यक्षमतेतील नफा ओळखून वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. सेमीकंडक्टर मेजर त्याच्या क्लायंट कंप्युटिंग आणि डेटा सेंटर विभागांमध्ये २० टक्के कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. गेल्या ऑक्टोबरमध्ये इंटेलने या वर्षी आपल्या खर्चात ३ अब्ज डॉलर कपात करण्याची योजना जाहीर केली. इंटेलने कॅलिफोर्नियामधील ५०० हून अधिक कर्मचार्‍यांना गेल्या वर्षी नारळ दिला होता, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. इंटेल वॉशिंग्टन काउंटी कॅम्पसमध्ये जवळपास २२००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत असल्याचं सांगितलं जात आहे

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lay off to 140 employees in intel new recruitment will also be stopped what is the reason vrd