पीटीआय, नवी दिल्ली

हवाई वाहतूक क्षेत्राची नियामक ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए)’ वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’ला (पूर्वीची ‘गो एअर’) विमानसेवा काही अटी-शर्तींवर पुन्हा सुरू करण्यास शुक्रवारी परवानगी दिली. निधीच्या तीव्र चणचणीमुळे उड्डाणे ठप्प असलेल्या या हवाई सेवेच्या १५ विमाने आणि दैनंदिन ११४ फेऱ्या करण्याच्या योजनेला त्यांनी मान्यता दिली.

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?

चालू वर्षात ३ मे रोजी ‘गो फर्स्ट’ने उड्डाणे तात्पुरती स्थगित करत असल्याचे जाहीर करतानाच, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) दिल्लीच्या खंडपीठापुढे स्वेच्छेने दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला होता. ‘गो फर्स्ट’ने रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या (आरपी) माध्यमातून पुनरूज्जीवन योजना आखताना, २८ जून रोजी डीजीसीएकडे पुन्हा विमानसेवा सुरू करण्यासाठी अर्ज सादर केला होती. त्यानंतर, नियामकांनी मुंबई आणि दिल्लीतील ‘गो फर्स्ट’च्या सुविधांचे विशेष परीक्षण केले. त्यात समाधानकारक स्थिती आढळल्याने ही सशर्त परवानगी देण्यात आली.

डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘गो फर्स्ट’ला विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

उड्डाणांसाठी अटी कोणत्या?

उड्डाणांसाठी सज्ज असलेल्या विमानांची योग्यता नेहमीच सुनिश्चित केली जाईल.

विमानांची स्थिती योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय विमान उड्डाणांसाठी वापरले जाणार नाही.

‘गो फर्स्ट’ने सादर केलेल्या योजनेतील कोणताही बदल ‘डीजीसीए’ला तत्काळ सूचित करावा लागेल.

आवश्यक अंतरिम निधीची उपलब्धता आणि ‘डीजीसीए’द्वारे उड्डाण वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतरच तिकिटांची विक्री सुरू करता येईल.

GAURAV MUTHE