शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व्यंकटसामी विघ्नेश याला आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी मिळाली, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नेहमी अभ्यासाशी जोडलेल्या विघ्नेशला शेतीचा अनुभव नव्हता. तसेच त्याने शेती करावी, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटत नव्हते. लॉकडाऊनदरम्यान घरी परतलेला विघ्नेश शेतीकडे वळला आणि नंतर त्याने अभियांत्रिकीच्या नोकरीला राम राम ठोकला. दोन वर्षांपूर्वी त्याच्या निर्णयावर कुटुंबीय खूश नव्हते. पण कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी जपानला गेलेला विघ्नेश आता वांग्याच्या शेतात काम करून मिळणाऱ्या उत्पन्नाने खूश आहे.
तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टी (Kovilpatti in Tamil Nadu) येथे राहणारा २७ वर्षीय विघ्नेश जपानमध्ये वांग्याच्या शेतात (brinjal farming in Japan) काम करतो. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून तिथे काम करताना त्याला जेवढे पैसे मिळत होते, त्याच्या दुप्पट पैसे वांग्याच्या उत्पादनातून मिळतात. तो काम करत असलेल्या ठिकाणी त्यांना मोफत राहण्याची सोयही आहे. विघ्नेश सांगतो की, जपानमध्ये कमी जिरायती जमीन असल्याने अतिशय आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. तेथे प्रति एकर उत्पादनही भारतापेक्षा जास्त आहे.
हेही वाचाः रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने केले सन्मानित
शेतीचे नियोजन करा
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, विघ्नेश जपानमध्ये वांग्याची शेती करतो. तसेच त्याला पिकाची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, असे त्याचे म्हणणे आहे. याशिवाय पीक तयार झाल्यावर त्याची कापणी, साफसफाई करून त्यावर प्रक्रिया करावी लागते. जपानमध्ये शिकण्यासारखं खूप काही असल्याचं विघ्नेश सांगतो. येथे बहुतांश काम मशिनद्वारे केले जाते. खूप कमी शारीरिक श्रम होतात.
हेही वाचाः RBI ची मोठी कारवाई, ४ बँकांना ठोठावला ४४ लाखांचा दंड, यात तुमची बँक तर नाही ना?
जपानी भाषा आणि संस्कृती शिकली
विघ्नेशने सांगितले की, जपानमध्ये कृषी क्षेत्रात काम शोधण्यापूर्वी त्याने चेन्नईच्या निहोन एज्युटेक (Nihon Edutech)मधून जपानी भाषा, संस्कृती आणि शिष्टाचार शिकून घेतले. Nihon Edutech भारतीय उद्योग महासंघ (CII) च्या सहकार्याने काम करते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर विघ्नेशला जपानमधील वांग्याच्या शेतात कृषी कामगार म्हणून नोकरी मिळाली.