भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ६.६६ टक्के हिस्सा अधिग्रहित केला आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या डिमर्जरनंतर ६.६६ टक्के भागभांडवल विकत घेतले आहे, अशी माहिती लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने मंगळवारी आपल्या नियामक फायलिंगमध्ये दिली.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स काल बाजारात सूचीबद्ध
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस २१ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. कंपनीचे बाजार भांडवल सुमारे १.६० लाख कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अधिग्रहणाची किंमत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिमर्जर खर्चाच्या ४.६८ टक्के आहे. LIC ने नॉन बँकिंग वित्तीय कंपनीच्या डिमर्जरद्वारे हे अधिग्रहण केले आहे, अशी माहिती एलआयसीनं दिली आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सने BSE वर सलग दुसऱ्या सत्रात लोअर सर्किट मर्यादा ओलांडली आहे. कंपनीचे शेअर्स ४.९९ टक्क्यांनी घसरून २३९.२० रुपयांवर व्यवहार करीत होते. विशेष म्हणजे LIC ने Jio Financial Services मधील ६.६६ टक्के हिस्सा घेतल्यानं त्याचा शेअर्स वाढायला मदत होणार असून, गुंतवणूकदारांनाही फायदा पोहोचू शकतो.
हेही वाचाः ‘या’ IPO मध्ये बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांची लागली रांग, तो उघडताच १०० टक्के प्रतिसाद
२१ ऑगस्ट रोजी बीएसईवर २६१.८५ रुपयांच्या तुलनेत १.२० टक्क्यांनी वाढून २६५ रुपयांवर सूचिबद्ध झाली. गेल्या महिन्यात झालेल्या विशेष किंमत शोध सत्रात ही किंमत ठरविण्यात आली होती. यानंतर कंपनीचा शेअर ३.८५ टक्क्यांनी घसरून २५१.७५ रुपयांवर आला. ही लोअर सर्किट मर्यादा आहे. सध्या Jio Financial Services चे शेअर्स १२.४५ अंकांनी घसरून २३६.४५ रुपये प्रति शेअर वर व्यवहार करीत आहेत.
हेही वाचाः अॅक्सिस बँकेचे नीलकंठ मिश्रा यांची UIDAI च्या अर्धवेळ अध्यक्षपदी नियुक्ती
जिओ वित्तीय सेवा व्यवसाय
Jio Financial Services कंपनी ही रिलायन्स इंडस्ट्रीजची वित्तीय सेवा कंपनी आहे. त्यात विमा आणि म्युच्युअल फंडासाठी परवाना आहे. याशिवाय तिची ६ कंपन्यांमध्येही होल्डिंग आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज (RIIHL), रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स, रिलायन्स रिटेल फायनान्स, जिओ पेमेंट्स बँक, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड या 6 कंपन्या आहेत.