806 Crore GST Notice: सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी LIC ला वर्ष २०२४ च्या सुरुवातीला मोठा झटका बसला आहे. विमा कंपनीला ८०६ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. नोटिशीनुसार, यामध्ये ३६५.०२ कोटी रुपयांचा जीएसटी, ४०४.७ कोटी रुपयांचा दंड आणि ३६.५ कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. या नोटिशीच्या विरोधात अपील करणार असल्याचे एलआयसीने म्हटले आहे.

कंपनीने नियामक फायलिंगमध्ये माहिती दिली

भारतीय आयुर्विमा महामंडळाला मुंबईतील राज्य कर उपायुक्त यांच्याकडून ही GST नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीने आपल्या नियामक फायलिंगमध्ये सांगितले की, ते या नोटिशीच्या विरोधात अपील दाखल करणार आहेत. कंपनीवर इनपुट टॅक्स क्रेडिटच्या नॉन रिव्हर्सल नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

हेही वाचाः GST Collection Rise : जीएसटी संकलन १४.९७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, अर्थ मंत्रालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध

कंपनी म्हणाली, कोणताही परिणाम होणार नाही

जीएसटीची मोठी नोटीस मिळाल्यानंतर एलआयसीने सांगितले की, ते निर्धारित वेळेत मुंबईतील आयुक्तांसमोर अपील दाखल करतील. मात्र, या GST नोटिसीचा कंपनीच्या आर्थिक, परिचालन किंवा इतर कोणत्याही कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सरकारी कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचाः २०२४ वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ठरणार लाभदायी; ‘या’ ६ गोष्टींमध्ये प्रगती केल्यास घेणार उंच भरारी

ऑक्टोबर २०२३ मध्ये ३७ हजार कोटी रुपयांची नोटीस प्राप्त झाली होती

यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये एलआयसीला सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचा जीएसटी मागणी आदेश पाठवण्यात आला होता. सरकारी कंपनीवर २०१९-२० च्या मूल्यांकन वर्षात काही चलनांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के दराने कर भरल्याचा आरोप होता. श्रीनगरच्या राज्य प्राप्तिकर अधिकाऱ्याने कंपनीवर १०४६२ कोटी रुपयांचा जीएसटी, २० हजार कोटी रुपयांचा दंड आणि ६,३८२ कोटी रुपयांचे व्याज आकारले होते.

ऑक्टोबर आणि सप्टेंबरमध्येही नोटिसा आल्या होत्या

याआधीही ऑक्टोबरमध्ये एलआयसीला ८४ कोटी रुपये आणि सप्टेंबरमध्ये २९० कोटी रुपयांच्या प्राप्तिकर दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. सोमवारी बीएसईवर एलआयसीचे शेअर्स ३.१ टक्क्यांनी वाढून ८५८.३५ रुपयांवर बंद झाले होते.