नवी दिल्ली : म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक अदानी समूहातील कंपन्यांपासून दूर जात असताना आणि त्यांच्या समभागांची विक्री थंडावली असताना भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही सरकारी कंपनी मात्र अदानी समूहामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करीत आहे. अदानी समूहातील ‘एलआयसी’च्या गुंतवणुकीचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत साधारणपणे पाच पट वाढले आहे.
‘एलआयसी’ने सन २०२०च्या सप्टेंबरपासून अदानी समूहाच्या सात पैकी चार सूचिबद्ध कंपन्यांमधील गुंतवणूक लक्षणीयरित्या वाढवली आहे. अदानी समूहाच्या सात कंपन्यांमधील ‘एलआयसी’च्या समभागांचे एकूण मूल्य सध्या ७४ हजार १४२ कोटी रुपये आहे. ‘एलआयसी’ची सर्वाधिक गुंतवणूकवाढ ‘अदानी टोटल गॅस’मध्ये झाली आहे. ती २०२०च्या सप्टेंबरमध्ये १ टक्क्यापेक्षा कमी होती, मात्र यंदाच्या सप्टेंबरमध्ये ती ५.७७ टक्के झाली. अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर आणि अदानी विल्मर या कंपन्यांतील ‘एलआयसी’च्या गुंतवणुकीत फारशी वाढ झालेली नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहापाठोपाठ ‘एलआयसी’ने गुंतवणूक केलेली अदानी समूह ही तिसरी सर्वात मोठी संस्था आहे.
वाढ किती टक्के?
’२०२०च्या सप्टेंबरमध्ये ‘अदानी टोटल गॅस’मधील ‘एलआयसी’ची गुंतवणूक १ टक्के होती, यंदा ती ५.७७ टक्क्यांवर
’‘अदानी एंटरप्रायझेस’ या प्रमुख कंपनीतील ‘एलआयसी’ची भागीदारी १ टक्क्यावरून ४.०२ टक्क्यांपर्यंत
’‘अदानी ट्रान्समिशन’मधील गुंतवणूक २.४२ टक्क्यांवरून ३.४६ टक्क्यांवर
’‘अदानी ग्रीन एनर्जी’मधील गुंतणूक १ टक्क्यावरून १.१५ टक्क्यांवर
गुंतवणूकवाढीचा चढता आलेख
अदानी समूह भांडवल (कोटींत) सप्टेंबर २०२० सप्टेंबर २०२२ (टक्के)
अदानी एन्टरप्रायझेस ४,४६,२९९ १ टक्क्यांपेक्षा कमी ४.०२
अदानी टोटल गॅस ३,९७,६१४ १ टक्क्यांपेक्षा कमी ५.७७
अदानी ग्रीम एनर्जी ३,३४,६४२ १ टक्क्यांपेक्षा कमी १.१५
अदानी ट्रान्समिशन ३,१५,९५७ २.४२ टक्के ३.४६