मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने छोट्या रकमेपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक शक्य बनवणाऱ्या, दरमहा २५० रुपयांच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’चा पर्याय खुला करण्याचा प्रस्ताव म्युच्युअल फंड उद्योगासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल. एलआयसीने ऑक्टोबर २०२४ पासून दरमहा किमान २०० रुपये ‘एसआयपी’चा पर्याय देऊ केला आहे. तर फंडात दररोज गुंतवणूक करणाऱ्यांना किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे एलआयसी एमएफचे मुख्याधिकारी आर.के. झा यांनी सांगितले. देशातील प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक असलेल्या, एलआयसी म्युच्युअल फंडाने, ‘एलआयसी एमएफ मल्टी अॅसेट अॅलोकेशन’ हा नवीन फंड गुंतवणुकीसाठी खुला केला आहे. यावेळी ते बोलत होते. या नवीन फंडाचा प्रस्तुती (एनएफओ) अर्थात प्रारंभिक गुंतवणूक कालावधी येत्या ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू आहे. ही एक गुंतवणुकीस कायम खुली (ओपन-एंडेड) असणारी योजना असून, जी समभाग (इक्विटी), रोखे (डेट) आणि सोन्यांत गुंतवणूक करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा