मुंबई : देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत ११,०५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवल्याचे शुक्रवारी जाहीर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यातील वाढ १७ टक्क्यांची आहे.
गतवर्षी याच तिमाहीत ‘एलआयसी’ने ९,४४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. तिचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १.०६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १.१७ कोटी रुपये होते. डिसेंबरच्या तिमाहीत एकूण उत्पन्नात घट झाली आहे, ते गेल्या वर्षीच्या २.१२ लाख कोटी रुपयांवरून २.०१ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. गुरुवारच्या सत्रात एलआयसीचा समभाग १.५३ टक्क्यांनी घसरून ८१६.१० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजार भावानुसार कंपनीचे ५.१६ लाख कोटींचे बाजार भांडवल आहे.
© The Indian Express (P) Ltd