मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने बाजारभांडवलाच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेला मागे सारत पहिले स्थान मिळविले आहे. परिणामी एलआयसी आता देशातील सर्वात मूल्यवाल सरकारी कंपनी बनली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘आत्मनिर्भर एसआयपी’ सुविधा माहिती आहे का?

एलआयसीचे बाजार भांडवल बुधवारच्या सत्रात ५,६१,३४३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर त्याच सत्राअखेर स्टेट बँकेचे बाजारभांडवल ५,५८,६८० रुपयांवर स्थिरावले. परिणामी स्टेट बँकेपेक्षा २६६३ कोटी रुपये अधिक आहे. एलआयसी आता देशातील पहिल्या दहा सर्वात मूल्यवान कंपन्यांच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. १८,४२,१६० कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. त्यापाठोपाठ टीसीएसचे बाजारभांडवल १४,२१,२३० कोटी, एचडीएफसी बँक ११,६६,८८८ कोटी, आयसीआयसीआय बँक ६,८७,७४० कोटी, इन्फोसिस ६,८०,६३१ कोटी, भारती एअरटेल ६,१०,३८९ कोटी, हिंदुस्थान युनिलिव्हर ६,०२,३८८ कोटी आणि आयटीसी ५,८२,४२३ कोटी रुपये आहे.

हेही वाचा >>> खाद्यतेल वर्षभर स्वस्त; आयातीला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली एलआयसी मे २०२२ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली होती. सरकारने प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून एलआयसीचे ३.५ कोटी समभागांची विक्री केली. सध्या कंपनीत सरकारचा ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic overtakes state bank of india in market capitalization print eco news zws