मुंबई : देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेली भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आता आरोग्य विमा व्यवसायात विस्ताराची शक्यता अजमावत आहे. आरोग्य विम्या पाऊल ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यमान विमा कायद्यात सुधारणा करून संमिश्र परवान्याला मुभा दिली जाईल अशी अपेक्षा आहे. विमा कायदा, १९३८ आणि भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणाच्या नियमांनुसार, विमा कंपनीला एका संस्थेच्या छत्राखाली आयुर्विमा, सामान्य किंवा आरोग्य विमा योजना देण्याची परवानगी नाही.

हेही वाचा >>> छोट्या व्यावसायिकांना २,००० कोटींच्या कर्ज वितरणाचे ‘कॉसमॉस बँके’चे लक्ष्य

एलआयसी अग्निशमन आणि अभियांत्रिकीसारख्या सर्वसाधारण विमा क्षेत्रातील तज्ज्ञ नाही. मात्र आरोग्य विमा क्षेत्रात चांगले कार्य करू शकते, असे मोहंती म्हणाले. फेब्रुवारीमध्ये, एका संसदीय समितीने देशात विम्याची व्याप्ती वाढवण्यासाठी एका संस्थेच्या छत्राखाली आयुर्विमा, सामान्य किंवा आरोग्य विमा योजना सुरू करण्यासाठी संमिश्र परवाना देण्याची सूचना केली आहे. माजी अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील समितीने सरकारला विमा कंपन्यांसाठी संमिश्र परवान्याच्या तरतुदीची आणि कायद्यात लवकरात लवकर या संबंधाने दुरुस्तीची सूचना केली होती. संमिश्र परवाने खुले झाल्यास विमा क्षेत्राला ते चालना देणारे ठरेल. यामुळे विमा कंपन्यांसाठी खर्च आणि अनुपालनातील अडचणी कमी होण्याची आशा आहे. ग्राहकांना कमीत कमी खर्चामध्ये अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. जसे की, आयुर्विमा, आरोग्य आणि बचत यांचा समावेश असणारी एकल योजना दिली जाऊ शकते, असे संसदेत सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. विमा नियामक इर्डादेखील विद्यमान विमा कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करत आहेत, असे त्यात म्हटले आहे.

हेही वाचा >>> सवलतीच्या दरात तेल खरेदीसाठी रिलायन्सचा रशियाच्या ‘रोझनेफ्ट’शी करार

एलआयसीला १३,७६३ कोटींचा नफा

एलआयसीने मार्च २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीत २ टक्के वाढ नोंदवत १३,७६३ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १३,४२८ कोटींचा नफा झाला होता. विमा कंपनीचे एकूण उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील २,००,१८५ कोटी रुपयांवरून २,५०,९२३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic preparation for expansion in health insurance sector print eco news zws
Show comments