पीटीआय, नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा निव्वळ नफा जूनअखेर तिमाहीत १० टक्क्यांनी वाढून १०,४६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ९,५४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
एलआयसीचे एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या जूनच्या तिमाहीत १,८८,७४९ कोटी रुपये होते, ते आता २,१०,९१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. पहिल्या वर्षातील हप्त्यापोटी उत्पन्न वाढून ७,४७० कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत ६,८११ कोटी होते. तर एलआयसीने नूतनीकरण हप्त्यांपोटी ५६,४२९ कोटी कमावले आहेत, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ५३,६३८ कोटी रुपये होते.
हेही वाचा >>>RBI Monetary Policy Meeting 2024 : गृहकर्ज, वाहनकर्जाचे हप्ते वाढणार नाहीत; ‘आरबीआय’ कडून व्याजदर जैसे थे!
समभागाचा वर्षभरात ७४.८८ टक्के परतावा
एलआयसीच्या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ७४.८८ टक्क्यांचा भरीव परतावा दिला आहे. तर विद्यमान वर्षात ३५.२१ टक्के, तीन महिन्यांच्या कालावधीत २१.०५ टक्के आणि एका महिन्यात ११.०८ टक्के परतावा दिला आहे. एलआयसीचा समभाग गुरुवारी ११२५.६० रुपयांवर स्थिरावला, परिणामी कंपनीचे बाजार भांडवल ७,११,९४१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
© The Indian Express (P) Ltd