आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपल्या ओळखीसाठी खूप महत्त्वाचे दस्तावेज आहेत. बऱ्याचदा कर दायित्वांसाठी पॅनचा वापर केला जातो, तर इतर अनेक कारणांसाठी आधार कार्डचाही उपयोग होतो. परंतु आता भारत सरकारच्या आदेशानुसार तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करावे लागणार आहे. तुम्ही हे ऑनलाईनदेखील करू शकता.

पॅन कार्ड हा १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असून, तो सर्व करदात्यांची ओळख म्हणून काम करतो. प्राप्तिकर विभाग पॅन क्रमांकाद्वारे तुमच्या व्यवहारांचा मागोवा घेतो. त्याचा वापर बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेद्वारे त्याच्या ओळखीसाठी केला जातो. आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. त्यात १२ अंक असतात. आधार कार्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग आणि घराचा पत्ता तुमच्या बायोमेट्रिक्ससह असतो. ते ओळखपत्र म्हणून वापरले जाते. बँक खाते, कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सेवेसाठी आधार कार्ड द्यावे लागते.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

पॅन कार्ड अनिवार्य आहे

वित्त कायदा, २०१७ नुसार तुम्हाला प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम १३९ एएअंतर्गत पॅन कार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. १ जुलै २०१७ नंतर भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड असणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचाः एअर इंडियाचा रेकॉर्ड मोडत ‘ही’ कंपनी इतिहास रचण्याच्या तयारीत; ५०० विमानांची सर्वात मोठी ऑर्डर देणार?

पॅनला आधारशी लिंक करा

तुम्हाला शक्य तितक्या लवकर पॅन कार्ड आधारशी लिंक करावे लागणार आहे. सरकारने त्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ निश्चित केली आहे. ही तारीख वाढवण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर तुम्ही पॅन लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड सक्रिय राहणार नाही. म्हणजेच आपण ते कागदपत्र म्हणून वापरू शकत नाही. आधार कार्ड आणि पॅन लिंक न केल्यास तुम्हाला दंडही भरावा लागेल. याचा तुमच्या TDS दरावरही परिणाम होणार आहे.

हेही वाचाः २०३० पर्यंत सोलर बाजारातही रिलायन्सचा दबदबा वाढणार अन् ६० टक्के वाटा होणार, अंबानींनी बनवला जबरदस्त प्लॅन

टीडीएसवर परिणाम होणार

>> जर तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या टीडीएसवरही दिसून येईल.
>> याचा तुमच्या TDSवर कसा परिणाम होणार हे समजून घ्या.
>> तुम्ही कोणतेही प्रलंबित रिटर्न दाखल करू शकत नाही.
>> पॅन लिंक नसल्यास तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही.
>> जर तुमचा पॅन लिंक नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे रिटर्न भरू शकत नाही.
>> यावर्षी ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२३ आहे.
>> एकदा पॅन कार्ड निष्क्रिय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या परताव्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही.
>> तुम्ही कोणत्याही कर परताव्यासाठी अर्ज केला असल्यास पॅन निष्क्रिय केल्यानंतर तुमचा अर्ज नाकारला जाईल.
>> तुम्हाला तुमचे पॅन कार्ड ३० दिवसांच्या आत पुन्हा सक्रिय करावे लागेल. यासाठी तुम्हाला १००० रुपये शुल्क भरावे लागेल.
>> निष्क्रिय पॅन केल्यानंतर तुमचा TDS दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
>> तसेच इतर कोणत्याही उत्पन्नावरील हा टीडीएस १ टक्क्यापेक्षा कमी असेल.