पीटीआय, नवी दिल्ली
व्यावसायिक नेटवर्क मंच लिंक्डइनने देशातील आघाडीच्या २५ कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. यात वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील १५ कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर लिंक्डइनने प्रथमच मध्यम आकाराच्या उत्कृष्ट कंपन्यांची यादीही जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी आणि प्रगतीसाठी आदर्श ठरणाऱ्या कंपन्यांची लिंक्डइनने ही क्रमवारी तयार केली आहे.
लिंक्डइनवरील विदा आणि कंपन्यांचे मानांकन याचा या यादीसाठी प्रामुख्याने आधार घेण्यात आला आहे. यात आठ महत्वाचे घटक आहेत. त्यामध्ये प्रगती, कौशल्य विकास, कंपनीचे स्थैर्य, बाह्य संधी, कंपनीबद्दलचा आपलेपणा, लिंग विविधता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि देशात कार्यरत मनुष्यबळ यांचा समावेश आहे. देशात मोठ्या कंपन्यांमध्ये आघाडीची कंपनी म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपले स्थान यंदाही कायम राखले आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी अॅक्सेंक्चर आणि तिसऱ्या स्थानी कॉग्निझंट आहे. या यादीतील ९ कंपन्या वित्तीय सेवा क्षेत्रातील असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहा कंपन्या आहेत.
आघाडीच्या २५ मोठ्या कंपन्या
टीसीएस, अॅक्सेंचर, कॉग्निझंट, मॅक्वारी ग्रुप, मॉर्गन स्टॅन्ले, डिलॉईट, एंड्रेस मायर्स स्क्वीब, जेपी मॉर्गन चेस, पेप्सिको, डीपी वर्ल्ड, एचसीएल एंटरप्राईज, ईवाय, श्नायडर इलेक्ट्रिक, अॅमेझॉन, कॉन्टिनेन्टल, मास्टरकार्ड, इंटेल कॉर्पोरेशन, आयसीआयसीआय बँक, मिशेलीन, फोर्टिव्ह, वेल्स फार्गो, गोल्डमन सॅश, नोव्हो जॉर्डिस्क, व्हियाट्रीस
उत्कृष १५ मध्यम कंपन्या
लेंट्रा, मेक माय ट्रीप, रेडिंग्टन लिमिटेड, इन्फोएज इंडिया, डिजिट इन्शुरन्स, एनएसई इंडिया, प्रोफेशनल असिस्टन्स फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन, आकासा एअर, नायका, पॉलिकॅब इंडिया, अप्रावा एनर्जी, एसव्हीसी बँक, मारिको लिमिटेड, ड्रीम ११, एचपीसीएल-मित्तल एनर्जी