पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्तिकर विभागाने ज्या करदात्यांनी पॅन-आधारची जोडणी अद्याप केलेली नाही त्यांना ती येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यास सुचविले आहे. जर प्राप्तिकर कायम खाते क्रमांक अर्थात ‘पॅन’ बायोमेट्रिक पद्धतीने आधारशी जोडलेला नसेल, प्राप्तिकराच्या नियमांनुसार तर अशा करदात्याचा उद्गम कर (टीडीएस) लागू दरापेक्षा दुप्पट दराने कापला जाणार आहे.

गेल्या महिन्यात, प्राप्तिकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात, ३१ मेपर्यंत करदात्याने पॅन-आधार जोडणी केलेली नसल्यास, दुप्पट दराने टीडीएस वसुलीची कारवाई केली जाणार नाही, असे नमूद केले आहे. वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांवर टीडीएस कापला जातो, ज्यामध्ये पगार, गुंतवणूक, बँक ठेवी, कमिशनचा समावेश असतो. मात्र शिथिलतेची ही मुदत ३१ मे नंतर संपुष्टात येत आहे.

आणखी वाचा-ग्राहकांच्या नावांनी बनावट खाती उघडली; RBI ने दोन बँकांना ठोठावला कोट्यवधींचा दंड, तुमचं खातं तर ‘या’ बँकेत नाही ना?

करदात्यांना टीडीएस/टीसीएसच्या ‘शॉर्ट-डिडक्शन/कलेक्शन’मध्ये कसूर झाल्याचे सूचित करणाऱ्या नोटिसा प्राप्त झाल्याच्या तक्रारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मंडळाने स्पष्टीकरणात सांगितले की, ३१ मार्च २०२४ पर्यंत झालेल्या व्यवहारांसाठी आणि ३१ मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पॅन- आधार जोडणी झाल्यास करदात्यांवर उच्च दराने कोणत्याही कराचा भार येणार नाही.

अशी करा पॅन-आधार जोडणी

  • प्राप्तिकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • ‘क्विक लिंक’ यावर क्लिक करा, त्यानंतर ‘लिंक आधार’ हा पर्याय दिसेल.
  • पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ‘व्हॅलिडेट’ हा पर्याय निवडा.
  • आधार कार्डवर असलेले नाव, मोबाइल क्रमांक नोंदवून ‘लिंक आधार’ पर्याय निवडा.
  • मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या ‘ओटीपीसह व्हॅलिडेट’ पर्याय निवडा.
  • मूळ मुदत उलटून गेली असल्याने या प्रक्रियेसाठी १,००० रुपये दंड भरावा लागेल.
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Linking of pan aadhaar mandatory by 31st may otherwise liable to double tds print eco news mrj