Jimmy Naval Tata Success Story : टाटा समूहाला नवीन उंची मिळवून देणारे ग्रुप चेअरमन रतन टाटा अतिशय साधे जीवन जगतात. त्यांच्या छोट्या पांढऱ्या टाटा नॅनोमध्ये प्रवास करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. रतन टाटा यांच्याशी संबंधित अनेक किस्से तुम्हाला माहीत असतील, पण तुम्हाला त्यांच्या धाकट्या भावाबद्दल माहिती आहे का? त्यांचा धाकटा भाऊ जिम्मी नवल टाटा कोणत्या प्रकारचे जीवन जगतो हे जाणून घेऊ यात.
रतन टाटा यांनी व्यावसायिक जीवन स्वीकारले, त्यांना त्यांचे काका जे. आर. टाटांचा वारसा सांभाळण्याची संधी मिळाली. पण त्यांचा भाऊ जिम्मी नवल टाटा यांनी साध्या जीवनाचा मार्ग स्वीकारला. टाटा कुटुंबाचा एक भाग असल्याने त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, तरीही ते अतिशय साधे जीवन जगतात आणि फक्त 2BHK फ्लॅटमध्ये राहतात.
हेही वाचाः सोशल मीडियावर वस्तू विकणाऱ्यांना नोटीस, १०००० कोटींची करचोरी उघड
दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे फ्लॅट
जिम्मी नवल टाटा हे मुंबईतील कुलाबा परिसरात राहतात. दक्षिण मुंबईतील या भागात टाटा कुटुंबाशी संबंधित अनेक लोक राहतात. टाटा समूहाचे सर्वात प्रसिद्ध ‘ताज हॉटेल’ याच भागात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिम्मी नवल टाटा ना स्वतःजवळ फोन ठेवतात आणि ना ते गॅजेट्सचे शौकीन आहेत. उलट त्यांना वाचनाची आवड आहे. ते एक उत्कृष्ट स्क्वॅशपटूही होते. सिएट टायर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आरपीजी ग्रुपचे मालक हर्ष गोएंका यांनीही त्यांच्या स्क्वॅश प्रतिभेबद्दल ट्विट केले होते. स्क्वॉशच्या खेळात प्रत्येक वेळी जिमी नवल टाटांनी त्यांचा पराभव केल्याचे हर्ष गोयंका सांगतात.
हेही वाचाः सॅम ऑल्टमन OpenAI मध्ये परतले; कंपनीनं सोशल मीडियावर केली घोषणा
टाटा कंपन्यांमधील भागधारक
टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये जिम्मी नवल टाटा यांची महत्त्वपूर्ण भागीदारी आहे. त्यांच्याकडे टाटा मोटर्सपासून टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर आणि टाटा केमिकल्सचे शेअर्स आहेत. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्येही त्यांची हिस्सेदारी आहे.