वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बँकांच्या कर्ज वितरणात गेल्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये सलग पाचव्या महिन्यांत घट नोंदविण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून समोर आले असून, असुरक्षित आणि वैयक्तिक कर्जांवरील मध्यवर्ती बँकेच्या निर्बंधानंतर बँकांच्या कर्जवाढीला लक्षणीय पाचर बसली आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बँकांच्या कर्ज वितरणात नोव्हेंबर २०२४ मध्ये ११.८ टक्के वाढ झाली. ही वाढ नोव्हेंबर २०२३ मधील १६.५ टक्क्यांच्या तुलनेत घटली आहे. यात एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाचा झालेला परिणाम समाविष्ट नाही. या विलीनीकरणाचा परिणाम विचारात घेतल्यास गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कर्ज वितरणात १०.६ टक्के वाढ झाली आणि त्याआधीच्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये ही वाढ २१ टक्के होती. कर्ज वितरणातील वाढीचा दर ऑक्टोबर २०२४ मध्ये विलीनीकरण वगळून १२.८ टक्के होता आणि विलीनीकरणासह ११.५ टक्के होता. त्याआधी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतही कर्ज वितरणातील वाढीचा दर क्रमाने घटत आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा