HDFC Bank MCLR Rate Hike : देशातील सर्वात मोठी खासगी कर्ज देणारी HDFC बँकेने MCLR मध्ये १५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर ७ जुलै २०२३ पासून लागू झाले आहेत. या निर्णयानंतर HDFC कडून कर्ज घेणे महाग होईल आणि EMI वाढेल. MCLR ठरवताना अनेक बाबी विचारात घेतल्या जातात, ज्यात ठेव दर (deposit rates), रेपो दर, परिचालन खर्च (operational cost) आणि रोख राखीव प्रमाण राखण्यासाठी लागणारा खर्च यांचा समावेश होतो. रेपो दरातील बदलाचा परिणाम MCLR दरावर दिसून येतो.
MCLR दर आता किती झाला?
बँकेचा ओव्हरनाइट MCLR १५ बीपीएसने वाढून ८.१० टक्क्यांवरून ८.२५ टक्क्यांपर्यंत गेला आहे. HDFC बँकेचा एक महिन्याचा MCLR ८.२० टक्क्यांवरून ८.३० टक्क्यांवर १० bpsने वाढला आहे. तीन महिन्यांचा MCLR देखील पूर्वीच्या ८.५० टक्क्यांवरून १० आधार अंकांनी ८.६० टक्क्यांनी वाढला आहे. सहा महिन्यांचा MCLR पूर्वीच्या ८.८५ टक्क्यांवरून केवळ ५ bps ने वाढून ८.९० टक्के झाला. तसेच एक वर्ष आणि एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या कर्जावर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या एक वर्षाचा MCLR ९.०५ टक्के आहे. या निर्णयानंतर केवळ MCLR शी जोडलेल्या जुन्या वैयक्तिक आणि वाहन कर्जांवर परिणाम होईल आणि EMI वाढणार आहे.
हेही वाचाः आरबीआयकडून पी. वासुदेवन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती, तीन विभागांची जबाबदारी सोपवली
एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण
HDFC लिमिटेड आणि HDFC बँक यांचे विलीनीकरण झाले आहे, जे १ जुलै २०२३ रोजी लागू झाले. एचडीएफसी लिमिटेडच्या ग्राहकांसाठी येथे काही महत्त्वाचे कर्ज संबंधित प्रश्न आहेत. विलीनीकरणानंतर तुमचे कर्ज HDFC बँकेत हस्तांतरित केले जाईल का? उत्तर होय आहे, विलीनीकरणानंतर सार्वजनिक खाते HDFC बँकेत हस्तांतरित केले जाईल. तुमचे ग्राहक लॉगिन क्रेडेन्शियल्स बदलणार नाहीत आणि तुम्हाला पोर्टलवर प्रवेश मिळत राहील. बँकेच्या सेवेचा लाभ घेता येईल. या विलीनीकरणामुळे HDFC Ltd चालू कर्जासाठी EMI बदलेल का? याला उत्तर देताना बँकेचे म्हणणे आहे की, याचा सर्वसामान्यांच्या ईएमआयवर परिणाम होणार नाही.
हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर परताव्याचे पाच नियम तुम्हाला माहीत आहेत का?