मुंबई: रिझर्व्ह बँकेकडून विद्यमान २०२५ च्या पहिल्या सहामाहीत रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची कपात केली जाणे शक्य आहे, असा कयास जेफरीज या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने शुक्रवारी व्यक्त केला. मध्यवर्ती बँकेच्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रोख राखीव प्रमाण (सीआरआर) ५० आधार बिंदूंनी कमी करण्यात आले. बँकिंग व्यवस्थेतील आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेतील निधीची तरलता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ५० आधार बिंदूंची कपात केली जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये पार पडलेल्या बैठकीत तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखालील समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने धोरण भूमिका बदलून ‘तटस्थ’ करण्याचा निर्णय घेतला होता. जून २०१९ नंतर पहिल्यांदाच झालेला हा भूमिकेत बदल होता, जे दर कपातीच्या दिशेने मध्यवर्ती बँकेचे पडलेले हे पहिले पाऊल होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा