lok Sabha Election Results 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे आणि सर्वांचे लक्ष शेअर बाजारावर आहे. दोन संभाव्य परिस्थितींवर शेअर बाजारामध्ये काय घडेल याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील NDA जिंकू शकते किंवा २००४ प्रमाणे इंडिया आघाडी देखील बाजी मारू शकते.

मागील सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीसह सर्व आघाडीचे निर्देशांक ताज्या उच्चांकावर पोहोचले आहेत आणि साथीच्या आजारानंतरच्या वर्षांत त्यांनी सर्वोत्तम इंट्राडे नफा नोंदवला. सोमवारी बहुतेक एक्झिट पोलने शेअर बाजारातील गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा दिला. कारण सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा ३५० हून अधिक जागा जिंकेल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ३६० ते ४०० च्या दरम्यान जागा मिळवू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?

हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: मतमोजणीच्या दिवशी शेअर बाजारात अनपेक्षित घडामोडी; ३१०० अंकांनी बाजार कोसळला!

पण एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरला तर आणि इंडिया आघाडीने दावा केल्याप्रमाणे बहुमत किंवा २९५ जागा मिळवल्या तर काय होईल? अशी चिंता अनेकांना वाटत आहे. जर असे झाले तर या प्रकरणात, भाजपाच्या मोठ्या विजयात कारणीभूत असलेला शेअर बाजार पत्यांच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो.

एक्झिट पोलने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या मोठ्या विजयाचा आशावाद आधीच व्यक्त केला आहे. यादरम्यान, भाजपाच्या विजयाच्या अपेक्षेमुळे मोदी स्टॉक्स किंवा PSU आणि इन्फ्रा शेअर्समध्ये प्रचंड तेजी आली आहे.

हेही वाचा – Gold-Silver Price: लोकसभेच्या निकालादिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…  

दीर्घकाळाचा विचार केला तर शेअर बाजार चांगली कामगिरी करेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची ८.२ टक्क्यांनी झालेली वाढ, नवीन सरकारचा पहिल्या १०० दिवसांचा कार्यक्रम आणि बजेटमध्ये असलेल्या तरतुदी हे घटकही शेअर बाजारातील घडामोडींसाठी महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

द अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपा स्वबळावर ३२२-३४० जागा जिंकेल; तर काँग्रेसला ६० ते ७६ जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार NDA लोकसभेच्या ३७९ जागा जिंकून प्रचंड बहुमतासह ऐतिहासिकदृष्ट्या तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ४० विरोधी पक्षांची युती असलेल्या इंडिया आघाडीला १३६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.