मुंबई : घोडदौडीवर निघालेले सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक हे नवनवीन अत्युच्च शिखरावर स्वारी करीत चालले आहेत. पण असा कमालीचा वर चढलेला बाजार जसा सुखावणारा, तसाच तो धाडकन् कोसळला तर.. या चिंतेपायी धडकीही भरवणारा. अशा समयी गुंतवणुकीची योजना नेमकी कशी असावी आणि बदल करायचे तर कोणते, या सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची दखल घेणारा आणि जोखीममुक्त गुंतवणुकीचा कानमंत्र देणारा ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा मार्गदर्शनपर कार्यक्रम येत्या बुधवारी, ३० नोव्हेंबरला योजण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पगारदार कर्मचाऱ्यांमध्ये अर्थसाक्षरतेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मालिकेतील ताजा कार्यक्रम, बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता, वसई-विरार महानगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकारी वर्गासाठी योजण्यात आला आहे. महापालिका मुख्यालय सभागृह, चौथा मजला, विरार (पूर्व) असे या कार्यक्रमाचे ठिकाण असून, गुंतवणूक नियोजनकार आणि अर्थ अभ्यासक कौस्तुभ जोशी हे त्यासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांना गुंतवणूकविषयक शंका आणि प्रश्न थेट विचारण्याची संधी यानिमित्ताने उपस्थितांना मिळेल. घटत असलेले बँक ठेवींचे व्याज दर, तर दुसरीकडे मौल्यवान धातूंमधील दरचकाकी आणि भरधाव तेजीसह ६२ हजारांच्या शिखरांवर पोहोचलेला ‘सेन्सेक्स’ अशा गोंधळून टाकणाऱ्या स्थितीत नेमका कोणता गुंतवणूक मार्ग अनुसरावा या प्रश्नाचा ते उलगडा करतील.

करोना साथ आणि टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी अर्थव्यवस्था अक्षरश: ठप्प झाली होती. आता सगळे व्यवहार पुन्हा रुळावर येताना दिसत असताना महागाईचे संकट उभे राहिले आहे. यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच आर्थिक आरोग्य टिकवणे किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व अधोरेखित झाले. सध्याच्या आर्थिक आघाडीवर अनिश्चितता आणि बाजारातही भीती घालणारी अस्थिरता असताना गुंतवणुकीचे धाडस करायचे तर कुठे, असा सर्वसामान्यांपुढे पेच आहे. त्यासाठी उपलब्ध पर्यायांविषयी या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक ऊहापोह करतील. आयुष्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर बदलत्या जबाबदाऱ्यांसह उत्पन्न, खर्च यांचा मेळ राखत आर्थिक नियोजनाची घडी यातून बसवली जाऊ शकते, हे कार्यक्रमातून सोदाहरण पटवून दिले जाईल.

गुंतवणुकीद्वारे अर्थ-नियोजन

वक्ते:   कौस्तुभ जोशी (वित्तीय नियोजनकार)

कधी:   बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२

केव्हा:   दुपारी ३.०० वाजता

कुठे:    महापालिका मुख्यालय, चौथा मजला,            विरार (पूर्व)

विनामूल्य प्रवेश केवळ वसई-विरार महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित 

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arthasalla event held tomorrow for vasai virar municipal employees zws