नाशिक : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकार विस्तारण्यात महत्त्वाचे भूमिका असणाऱ्या उद्योग क्षेत्राची पुढची झेप, त्या संबंधाने असणारी आव्हाने, समस्या आणि उपाय यावर मंथन करण्यासाठी गुरुवारी (१७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता नाशिक येथे ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह २०२३’ या उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह नाशिक येथील उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक या परिषदेत सहभागी होतील. मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इन येथील ग्रॅड्यूर सभागृहात ही परिषद होणार आहे. देशातील एकूण औद्योगिक उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. या क्षेत्रातून देशाला मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास ४० टक्के महसूल महाराष्ट्रातून मिळतो. अनेक मोठे उद्योग, हजारो लघु आणि मध्यम उद्योग, त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे.
हेही वाचा – झी-सोनी विलीनीकरणाला ‘एनसीएलटी’ची परवानगी
नाशिकमध्ये मुख्यत्वे वाहन, इलेक्ट्रिक आणि वाइन क्षेत्रातील उद्योग आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योजकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. हाच धागा पकडून लघु-मध्यम उद्योग क्षेत्रासमोरील आव्हाने, समस्या आणि उपाय यावर उद्योजक, विश्लेषक, सरकारचे प्रतिनिधी यांना ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’च्या व्यासपीठावर आणून चर्चा घडविण्यात येणार आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, त्या अनुषंगाने औद्योगिक विकास आणि त्यासाठी पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या बदलांचा ऊहापोहदेखील या परिषदेत केला जाईल. उद्योगचक्र गतिमान करण्यासाठी नवी गुंतवणूक आणणे, सामंजस्य करार याद्वारे प्रयत्न होत आहेत. याचा उद्योग क्षेत्रावर होणारा परिणाम, लघु व मध्यम उद्योगांना मिळणारी संधी, रोजगार निर्मिती, याबरोबरच राज्य सरकार नव्या औद्योगिक संधी कुठे उपलब्ध करून देत आहे, आदी माहिती या परिषदेतून मिळणार आहे.