पुणे : किरकोळ गुंतवणूकदारांसाठी भांडवली बाजार हे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचे साधन बनायला हवे. तथापि कथित गुंतवणूक गुरूंच्या सांगण्यानुसार निर्णय घेतल्याने गुंतवणूकदार तोटा करून बसतात आणि परिणामी या गुंतवणूक पर्यायाकडेच ते पाठ करतात. त्यामुळे सावधगिरी, संयम, सातत्य आणि प्रसंगावधान गुंतवणूकदारांनी राखलेच पाहिजे, असा सल्ला राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांनी दिला.

मुंबईतील ‘एनएसई’च्या मुख्यालयात काही निमंत्रित माध्यम प्रतिनिधींशी चौहान यांनी संवाद साधला. अनेक तथाकथित गुंतवणूक गुरू समाज-माध्यमातून गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातून निश्चित परतावा मिळवून देण्याचा सल्ला देतात. त्यांचा सल्ला ऐकून फसवणूक करून घेणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रमाण खूप आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चौहान यांनी भांडवली बाजारातील ज्ञान, अनुभव कमावण्यासह, किरकोळ गुंतवणूकदारांनी या गुंतवणूक पर्यायाकडे वळताना सावधगिरी आणि संयम बाळगणे अत्यावश्यक असल्याचा सल्ला दिला.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?

हेही वाचा – चांगली बातमी! अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीने ओलांडला ६ कोटींचा टप्पा; छोट्या गुंतवणुकीतून दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळणार

चौहान म्हणाले की, कोणत्याही अर्थ सल्लागारावर सर्वस्वी विसंबून गुंतवणूक करू नये. फसवी जाहिरात पाहून अथवा मोबाइल फोनवर आलेल्या टिप्सच्या आधारे भांडवली बाजारात पैसा गुंतवू नये. अशा प्रकारची गुंतवणूक ही जोखमीची ठरेल. प्रत्यक्षात यातून अनेक गुंतवणूकदारांना तोटाही होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून भांडवली बाजारात पैसे गुंतवावेत. तसेच बरोबरीने म्युच्युअल फंडांचा पर्यायही गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे. आपल्याकडे भांडवली बाजारासंबंधी पुरते ज्ञान असेल तरच दैनंदिन व्यवहार अर्थात ‘डे ट्रेडिंग’चा पर्याय आजमावला जावा, असेही त्यांनी सुचविले.

हेही वाचा – ‘एसआयपी’तून वर्षभरात १.६६ लाख कोटींचा ओघ, गुंतवणूक मर्यादा २५० रुपयांपर्यंत घटल्याने आणखी चालना शक्य

भांडवली बाजारात समभाग गुंतवणूक करताना, त्या कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवस्थापन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो. तुमच्याकडे यासाठी वेळ आहे का? तुमच्याकडे वेळ नसेल तर लांबच्या कालावधीसाठी सुरक्षित पर्यायात पैसे गुंतवणे उत्तम, त्यांनी ‘डे ट्रेडिंग’च्या नादी लागू नये. – अशीषकुमार चौहान, व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, राष्ट्रीय शेअर बाजार